esakal | "जगावं की मरावं'..दिव्यांग आजीबाईला आले चक्क सोळा हजारांचे वीजबिल..!
sakal

बोलून बातमी शोधा

divyang sun.jpg

महिला दिव्यांग असून, सून व तीन नातवांसह दोन वर्षांपासून राहतात. पाच वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे हृदयविकाराने निधन झाले. घरातील कमवता मुलगा घर सोडून निघून गेला. आता घराची संपूर्ण जबाबदारी सुनबाईवर आली आहे. आणि अशातच हे सोळा हजाराचे वीजबिल..त्यामुळे जगावं की मरावं असा प्रश्न आपोआपच येत आहे.

"जगावं की मरावं'..दिव्यांग आजीबाईला आले चक्क सोळा हजारांचे वीजबिल..!

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / सिडको : महिला दिव्यांग असून, सून व तीन नातवांसह दोन वर्षांपासून राहतात. पाच वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे हृदयविकाराने निधन झाले. घरातील कमवता मुलगा घर सोडून निघून गेला. आता घराची संपूर्ण जबाबदारी सुनबाईवर आली आहे. आणि अशातच हे सोळा हजाराचे वीजबिल..त्यामुळे जगावं की मरावं असा प्रश्न आपोआपच येत आहे.

कुटुंबाची जबाबदारी दिव्यांग सुनबाईवर..अशातच सोळा हजाराचे वीजबिल

इमारत क्रमांक 2 मधील पहिल्या मजल्यावरील फ्लॅट क्रमांक 1 मध्ये चंद्रकला मकासरे दिव्यांग असून, सून व तीन नातवांसह दोन वर्षांपासून राहतात. पाच वर्षांपूर्वी त्यांच्या पतीचे हृदयविकाराने निधन झाले. घरातील कमवता मुलगा घर सोडून निघून गेला. आता घराची संपूर्ण जबाबदारी सुनबाईवर आली आहे. त्यातच लॉकडाउनमुळे कामही बंद असते. महिन्याला सरासरी दोनशे ते तीनशे रुपये बिल येत होते. वीजबिल थकल्याने सहा महिन्यांपूर्वी कंपनीच्या कर्मचाऱ्यांनी वीजमीटर काढून नेल्याचे त्यांनी सांगितले. परंतु, सहा महिन्यांत एवढ्या मोठ्या प्रमाणात बिल कसे येऊ शकते, असा प्रश्‍न उपस्थित करण्यात आला. 

हेही वाचा > काय सांगता..! कोरोना प्रतिबंधासाठी नारळ व खोबरे तेल ठरतेय रामबाण उपाय...प्राथमिक संशोधनातून समोर

वीज कंपनीकडे तक्रार करूनही उपयोग नाही

अंबड येथील चुंचाळे शिवारातील महापालिकेच्या घरकुल योजनेच्या इमारतीत घरगुती वापर असलेल्या मीटरचे सहा महिन्यांचे बिल सोळा हजार रुपये आल्याने दिव्यांग महिलेचे कुटुंब त्रस्त झाले आहे. वीज कंपनीकडे तक्रार करूनही उपयोग झाला नसल्याचे त्यांनी सांगितले. 

हेही वाचा > हॅलो..सैन्यदलातून बोलतोय..समोरून भामट्याने घातला असा गंडा..

"जगावं की मरावं', असा प्रश्‍न
घरकुल योजनेतील दोन छोट्या खोल्या आहेत. एक टीव्ही आणि दोन बल्ब असताना आतापर्यंत केवळ दोनशे-तीनशे रुपये महिन्याचे वीजबिल येत होते. सोळा हजार 120 रुपये बिल आल्याने आता "जगावं की मरावं', असा प्रश्‍न आमच्यासमोर उभा ठाकला आहे. -चंद्रकला मकासरे, वीजग्राहक 

go to top