खळबळजनक! ग्रामपंचायत कर्मचाऱ्याची गोळ्या झाडून हत्या; सख्खा भाऊ पोलिसांच्या ताब्यात

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 7 October 2020

सिन्नर तालुक्यातील वडझिरे ग्रामपंचायतीचे कर्मचारी देविदास कुटे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मंगळवारी (ता.६) रात्री १२ च्या दरम्यान वाजता ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे.

नाशिक/ सिन्नर  : सिन्नर तालुक्यातील वडझिरे ग्रामपंचायतीचे कर्मचारी देविदास कुटे यांची गोळ्या झाडून हत्या करण्यात आली. मंगळवारी (ता.६) रात्री १२ च्या दरम्यान वाजता ही घटना घडली. घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन तपास सुरू केला आहे

३ गोळ्या कुटेंना लागल्याने जागीच मृत्यू

मंगळवारी रात्री १२ वाजे दरम्यान एक धक्कादायक घटना घडली. वडझिरे ग्रामपंचायतीचे कर्मचारी देविदास कुटे यांच्यावर हल्लेखोरांनी चार गोळ्या झाडल्या. त्यात ३ गोळ्या कुटेंना लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला. याप्रकरणी संशयित सख्या भावासह साथीदारास पोलिसांनी ताब्यात घेतले. असून हत्येचं नेमकं कारण समजू शकलं नाही.

हेही वाचा > गुजरातहून औरंगाबादला पोहचवायचे होते 'घबाड'; पोलिसांच्या कारवाईने फिस्कटला प्लॅन

गावात तणावाचे वातावरण

याप्रकरणी रात्री उशिरापर्यंत गुन्हा नोंद करण्याची प्रक्रिया सुरू होती. या घटनेनं गावात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलिसांनी बंदोबस्त वाढवला आहे. 

हेही वाचा > ...म्हणून अधिकृत मेडिकलमधूनच खरेदी करा औषधे! रुग्ण व नातलगांना सतर्कतेचा इशारा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Gram Panchayat employee murder sinner nashik marathi news