Gram Panchayat Result : राज्यातील नागरिकांनी महाविकास आघाडी स्वीकारली - छगन भुजबळ

विनोद बेदरकर
Monday, 18 January 2021

राज्यातील तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार जनतेने स्विकारले आहे. त्यामुळे नाशिकसह राज्यभर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना चांगली मत पडली त्यामुळे आता भाजपने या निकालाचे आत्मचिंतन करावे असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

नाशिक : राज्यातील तीन पक्षांचे महाविकास आघाडीचे सरकार जनतेने स्विकारले आहे. त्यामुळे नाशिकसह राज्यभर महाविकास आघाडीच्या उमेदवारांना चांगली मत पडली त्यामुळे आता भाजपने या निकालाचे आत्मचिंतन करावे असे प्रतिपादन पालकमंत्री छगन भुजबळ यांनी केले.

ग्रामपंचायत निकालाचे आत्मचिंतन करावे; पालकमंत्री भुजबळांचा भाजपला सल्ला 

रस्ते सुरक्षा उध्दाटनाच्या निमित्ताने भुजबळ आले असतांना पत्रकारांशी बोलत होते. भुजबळ म्हणाले की, राज्यभरातील गावात महाविकास आघाडीला मिळालेले घवघवीत यश म्हणजे राज्यातील नागरिकांनी महाविकास आघाडी स्विकारली.हेच निवडणूकीचे विश्लेषण आहे. भाजपच्या ने्त्यांनी आत्मचिंतन करायला हवे. औरंगाबाद शहराचे संभाजीनगर नामांतराच्या अनुषंगाने जास्त ताणले जाउ नये.बेळगावला मराठी भाषिकावर अन्याय सुरु आहे. सर्वोच्च न्यायालयात खटला सुरु असतांना कर्नाटक सरकारकडून सुरु असलेली गळचेपी अयोग्य आहे.

धनंजय मुंडे प्रकरणी भुजबळ म्हणाले....

धनंजय मुंडे यांची चौकशी सुुरु आहे. त्यांच्याशिवाय आणखी एक दोन तक्रारी आल्या आहेत. त्यामुऴे काही लोक नुसते ब्लॅकमेल करतात हेही पुढे येते आहे. त्यामुळे या सगळ्याची सविस्तर चौकशी सुरु आहे.

स्व नव्हे सामायिक बळाची भाषा
ग्रामपंचायत निवडणूकाप्रमाणे आगामी निवडणूकात हेच यश कायम ठेवण्यासाठी स्वबळाची नव्हे तर तीन्ही पक्षांना सामुहीक बळाची भाषा करावी लागणार आहे. सामुहीक बळाची भाषा केली तरच यापुढील निकाल महाविकास आघाडीसाठी चांगले राहतील. असेही त्यांनी स्पष्ट केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Guardian Minister Bhujbal advice to BJP nashik marathi news