VIDEO : नाशिकमध्ये अतिरिक्त 640 बेडच्या व्यवस्थेसह वैद्यकीय सुविधांमध्येही वाढ : पालकमंत्री

Guardian Minister Bhujbal has said facilities and extra beds have been increased in hospitals Nashik
Guardian Minister Bhujbal has said facilities and extra beds have been increased in hospitals Nashik
Updated on

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील वाढती कोरोना रुग्णसंख्या लक्षात घेता जिल्हा सामान्य रुग्णालय व बिटको रुग्णालयात एकूण 640 अतिरिक्त बेडची व्यवस्था करण्यात येणार आहे. यासह आवश्यक वैद्यकीय सुविधांमध्येही वाढ करण्यात आली असल्याचे राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे. 

कोरोनारुग्णांची वाढती रुग्णसंख्या लक्षात बिटको व जिल्हा सामान्य रुग्णालयाला पालकमंत्री छगन भुजबळ यांनी  भेट देवून पाहणी केली, तसेच आरोग्य यंत्रणेचा आढावा घेतला.

एकूण 640 अतिरिक्त बेडची वाढ

यावेळी पालकमंत्री छगन भुजबळ म्हणाले, जिल्हा सामान्य रुग्णालयात पूर्वी 110 खाटांची क्षमता होती. तेथे आता 90 बेड वाढविल्याने 200 बेडची क्षमता झाली आहे. तसेच बिटको रुग्णालयात 300, तसेच नाशिकरोड येथील अग्निशमन दलाची इमारत व भक्तनिवास या कोविड केअर सेंटरमध्ये 250 असे एकूण 640 अतिरिक्त बेडची वाढ करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनामार्फत मविप्र आणि एसएमबीटी रुग्णालय अधिग्रहीत करण्यात येणार असून, त्यांच्या माध्यमातूनही बेड उपलब्ध होतील असेही, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे.  

प्रति दिवस पाच हजार स्वॅब तपासणी

बिटको रुग्णालयात अत्याधुनिक दर्जाचे सिटी स्कॅन मशिनची व्यवस्था करण्यात आली आहे. हे मशिन लवकरच रुग्णांच्या सेवेत येणार असून दिवसभरात दोनशे रुग्णांचे स्कॅनिंग होणार आहे. तसेच बिटकोमध्ये लवकरच प्रति दिवस पाच हजार स्वॅब तपासले जाणार असल्याची माहिती, पालकमंत्री छगन भुजबळ यांनी दिली आहे. कोरोनाग्रस्त रुग्णांना योग्य उपचारांबरोबरच ऑक्सिजन वेळेत उपलब्ध होण्यासाठी नवीन 250 लिटर क्षमतेचे 27 ड्युरा सिलेंडर मागविण्यात आले आहे. या सिलेंडरमुळे ऑक्सिजन पुरवठा सुरळीत करणे सुलभ होणार आहे.

10 ते 12 व्हेंटीलेटर राखीव

कोरोनावर नियंत्रण मिळविण्यासाठी आवश्यक सर्व सुविधांचे नियोजन प्रशासन आपल्यास्तरावरुन करत आहे. तरीही कोरोनासारख्या संकटकाळात खाजगी डॉक्टर, नर्स, लॅब टेक्निशियन, निवृत्त अधिकारी आणि कर्मचारी यांना आपली सेवा देण्यासाठी पुढे यावे, असे आवाहनही पालकमंत्री छगन भुजबळ यांनी यावेळी केले आहे.  व्हेंटीलेटरबाबत योग्य नियोजन करुन आवश्यक त्या ठिकाणी व्हेंटीलेटर पोहचविण्यात आले असून, 10 ते 12 व्हेंटीलेटर आपत्कालीन परिस्थितीतीसाठी राखीव ठेवण्यात आले असल्याचे पालकमंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले आहे. पालकमंत्री  छगन भुजबळ यांनी बिटको रुग्णालयातील सिटी स्कॅन, एमआरआय कक्ष, कोविड कक्ष, प्रयोगशाळेस भेट दिली. तसेच जिल्हा सामान्य रुग्णालयातील ऑक्सिजन पुरवठा व अतिरिक्त वाढविण्यात आलेल्या बेडचा आढावा घेतला. तसेच कोरोनाबधित गर्भवती महिलांसाठी तयार करण्यात आलेल्या कोविड कक्षाचीही पाहणी केली आहे. 

यावेळी माजी खासदार समीर भुजबळ, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, महानगरपालिका आयुक्त कैलास जाधव, मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, अतिरिक्त मनपा आयुक्त प्रवीण अष्टीकर, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. किशोर श्रीवास, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. कपिल आहेर, विभागीय अधिकारी डॉ. दिलीप मेनकर, वैद्यकीय अधिकारी डॉ. निखिल सैंदाणे, वैद्यकीय अधिकारी डॉ. अनंत पवार, डॉ. आवेश पलोड आदी उपस्थित होते. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com