'कस्टमर केअर सेंटरवरून बोलतोय' म्हणत लावला हजारोंचा चुना; पोलिसांत गुन्हा दाखल

संतोष विंचू
Sunday, 4 October 2020

'कस्टमर केअर सेंटरवरून बोलतोय', असे सांगून पारेगाव येथील फोटोग्राफर पंढरीनाथ ढगे यांना गुगल पेच्या माध्यमातून ८० हजारांना फसवण्यात आले. यासंदर्भात त्यांनी नाशिक पोलिस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेलकडे तक्रार दिली. वाचा सविस्तर प्रकार

नाशिक : (येवला) 'कस्टमर केअर सेंटरवरून बोलतोय', असे सांगून पारेगाव येथील फोटोग्राफर पंढरीनाथ ढगे यांना गुगल पेच्या माध्यमातून ८० हजारांची फसवणूक झाल्याची घटना घडली. यासंदर्भात त्यांनी नाशिक पोलिस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेलकडे तक्रार दिली. वाचा सविस्तर प्रकार

अशी आहे घटना

ढगे आपल्या मित्राला २७ सप्टेंबरला गुगल पेच्या माध्यमातून पैसे पाठवत होते. मात्र पैसे पाठवण्याची प्रोसेस पूर्ण न होता ट्रान्झेक्शन फेल होत असल्याने त्यांनी गुगल पेच्या ग्राहक सेवा क्रमांकावर संपर्क साधून तक्रार नोंदवली. काही वेळातच ढगे यांना पुन्हा एका अनोळखी मोबाईल क्रमांकाहून कॉल आला व गुगल पे ग्राहक सेवा प्रतिनिधी बोलतो, असे सांगून त्याने ढगे यांच्याकडून यूपीआय नंबर घेत गुगल पे खाते हॅक केले. यूपीआय आयडीच्या माध्यमातून दहा हजारांचे आठ वेळा ट्रान्झेक्शन करून स्वतःच्या बँक खात्यात रक्कम ट्रान्स्फर करत ८० हजार रुपये काढून घेतले. 

हेही वाचा > संतापजनक! सोळा वर्षाच्या युवतीसोबत चाळीस वर्षीय नवरदेवाचे लग्न; बालविवाह कायद्यातंर्गत गुन्हा दाखल

काही वेळानंतर ढगे यांना मेसेज यायला सुरुवात झाली. काहीतरी गडबड आहे. असा संशय आल्याने ढगे यांनी फसवणूक बाबत नाशिक पोलिस अधीक्षक कार्यालयातील सायबर सेलकडे तक्रार दिली. 

हेही वाचा >  ब्रेकिंग : पाकिस्तानसाठी तोफखान्याची हेरगिरी करणारा नाशिकमधून ताब्यात; सीमेवर तणावपूर्ण वातावरण असताना प्रकरण उजेडात


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: By hacking Google Pay account Robbery of 80 thousand nashik marathi news