धक्कादायक! रागाच्या भरात 'त्याने' थेट सहाय्यक पोलिस निरीक्षकांच्या हातालाच घेतला चावा...अन् मग

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 21 मे 2020

एका संशयिताने सहाय्यक पोलिस निरीक्षकांना चावा घेत जखमी केल्याची घटना मंगळवारी (ता. 19) रात्री अकराच्या सुमारास घडली. तसेच त्याने दोन पोलिस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत जखमी केले. संशयिताविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला. 

नाशिक : (जुने नाशिक) एका संशयिताने सहाय्यक पोलिस निरीक्षकांना चावा घेत जखमी केल्याची घटना मंगळवारी (ता. 19) रात्री अकराच्या सुमारास घडली. तसेच त्याने दोन पोलिस कर्मचाऱ्यांना धक्काबुक्की करत जखमी केले. संशयिताविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला. 

अशी आहे घटना

संशयित मुर्तजा ताहेर रामपूरवाला (वय 37, रा. त्रिकोणी गार्डन, काठे गल्ली) मंगळवारी रात्री त्याच्या आई-वडिलांशी वाद घालत होता. आरडाओरड करत असल्याने परिसरातील नागरिकांनी पोलिसांना पाचारण केले. भद्रकाली पोलिस ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक संदीप वऱ्हारे कर्मचाऱ्यांसह घटनास्थळी दाखल झाले. त्याने पोलिसांना येण्यास मज्जाव केला. संशयिताच्या आईने दार उघडून पोलिसांना आत घेतले. आमचा घरगुती वाद आहे, पोलिसांनी हस्तक्षेप करू नका, असे म्हणत त्याने आई-वडिलांना शिवीगाळ केली. श्री. वऱ्हारे यांच्यावर कुकरने हल्ला केला. तसेच वऱ्हारे यांच्या हाताचा चावा घेतला. 

हेही वाचा > महत्वाची बातमी! जूनमध्ये होणारी सेट परीक्षा पुढे ढकलली...

पोलिस कर्मचारी श्री. भवर आणि देसले यांच्याशी झटापटी करत त्यांनाही जखमी केले. बिट मार्शलच्या मदतीने त्याला ताब्यात घेण्यात आले. संशयिताविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल झाला. 

हेही वाचा > BIG BREAKING : एमएचटी-सीईटीच्या तारखा जाहीर; सत्रनिहाय होणार परिक्षा


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: In the hands of an assistant police inspector The suspect took a bite nashik marathi news

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: