संवादची साथ! कर्णबधीर चिमुकल्‍यांची श्रवणदोषावर मात; मुलांच्या व पालकांच्या डोळ्यात आनंदाश्रू 

samvad shravan.jpg
samvad shravan.jpg

नाशिक : देशात गेल्या तीन वर्षांपासून सोनोवा-हिअर द वर्ल्ड यांनी दर वर्षी गरजू अनेक मुलांना डिजिटल श्रवणयंत्र देण्याचा निर्धार केला आहे. यावर्षी राज्‍यात नाशिकचे संवाद स्पीच अँड हिअरिंग क्लिनिक पहिले मानकरी ठरले आहे.

संवादच्‍या साथीने कर्णबधीर चिमुकल्‍यांची श्रवणदोषावर मात 

प्रत्येक श्रवणदोष असलेल्या मुलाला चांगले ऐकण्याची संधी मिळावी या धेय्याने उपक्रमातून श्रवण यंत्रे देऊन त्यांचे आयुष्य बदलले आहे. ही श्रवणयंत्रे पूर्णतः डिजिटल आणि कॉम्पुटरद्वारे सेटिंग करता येणारी आहेत, असे संवाद क्लिनिकचे संचालक दाम्पत्य ऑडिओलॉजिस्ट आणि स्पीच थेरपिस्ट राहुल वैद्य व गायत्री वैद्य यांनी सांगितले. वातावरणातील आवाजांमधील बदलानुसार श्रवणयंत्रांमध्ये ऑटोमॅटिक बदल होतात. त्यामुळे श्रवणदोष असणारी मुले स्पष्ट आवाज ऐकू शकतात. आजूबाजूच्या गोंधळाचाही त्यांना त्रास होत नाही. ही श्रवणयंत्रे वॉटरप्रूफ आहेत. अशी श्रवणयंत्रे खूप महाग असल्यामुळे प्रत्येकाला विकत घेणे परवडत नाही. अशाप्रकारची प्रगत तंत्रज्ञान असलेली श्रवणयंत्रे वापरल्यामुळे श्रवणबाधित मुलांचा भाषा वाचा विकास उत्तम प्रकारे होऊ शकतो. त्याबरोबरच त्यांची शैक्षणिक प्रगतीही होते. उपक्रमासाठी सोनोवा हिअरिंग इंडिया प्रा.लिमिटेडचे संचालक रजनीश कामत व त्यांचे इतर सहकारी उपस्थित होते.  

मुलांच्या व पालकांच्या चेहऱ्यावर आनंदाश्रू

संवाद स्पीच अँड हिअरिंग क्लिनिक आणि सोनोवा- हिअर द वर्ल्ड, स्वित्झर्लंड यांच्यातर्फे महात्‍मा गांधी यांच्‍या जयंतीनिमित्त सामाजिक उपक्रम राबविला. याअंतर्गत गरीब व गरजू मुलांना नि:शुल्क श्रवणयंत्रांचे वाटप केले. श्रवणयंत्र मिळाल्यानंतर मुलांच्या व पालकांच्या चेहऱ्यावर आनंदाने हसू फुलले होते. 

संपादन - ज्योती देवरे

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com