esakal | तीन तास मातृत्व धोक्यात; देवदूतांच्या समयसूचकतेने वाचले प्राण!
sakal

बोलून बातमी शोधा

kalwan 2.jpg

घरीच प्रसूती झाल्यानंतर नाळ येत नसल्याने तीन तासानंतर महिलेला कळवणच्या उपजिल्हा रुग्णालयात दाखल केले. रुग्णालयात येताच प्रसूत माता बेशुद्ध झाली. कुटुंबियांच्या काळजाचा ठोकाच चुकला. वाचा काय घडले नेमके? 

तीन तास मातृत्व धोक्यात; देवदूतांच्या समयसूचकतेने वाचले प्राण!

sakal_logo
By
रविंद्र पगार

नाशिक : (कळवण) समाजात सरकारी हॉस्पिटलकडे बघण्याचा नागरिकांचा दृष्टीकोन काहीसा दूषित असताना या घटनेच्या निमित्ताने शासकीय यंत्रणेतील कर्म हीच पूजा मानणाऱ्या काही देवदूतांचं दर्शन घडलं आहे. होय ही आहेत शासकीय आरोग्य सेवेतील देवदूत! तिचं मातृत्व जपण्यासाठी त्यांची धडपड वाचा...

अशी आहे घटना

बुधवारी (ता. ३०) रोजी कळवण तालुक्यातील बिलवाडी येथील वैशाली लक्ष्मण महाले ही महिला घरीच प्रसूत झाली होती. मात्र नाळ येत नाही म्हणून तीन तासानंतर कळवण उपजिल्हा रुग्णालयात दाखल झाली. रुग्णालयात दाखल होताच ती बेशुद्ध पडली होती. तिचा पल्स व बीपी लागत नव्हता. नाळेतून रक्तस्राव होत होता आणि एचबी चार ग्रॅम होते. परंतु डॉ. पराग पगार यांनी लागलीच रक्तस्राव थांबवून fluid resuscitation केले व पेशंटला शुद्धीवर आणून तिचा पल्स व बीपी वरती आणला. स्त्रीरोग तज्ञ डॉ. निलेश लाड यांनी नाळ काढून पुनश्च रक्तस्राव होण्याचा व मोठ्या शस्रकियेचा धोका टाळला. त्वरित रक्तपिशवी देऊन सदर प्रसूत मातेला जीवदान दिले. 

डॉक्टरांच्या रूपात देवदूत दिसल्याची भावना...

प्रसूत मातेचे कळवण उपजिल्हा रुग्णालयातील डॉक्टरांनी योग्य उपचार करून तत्परतेने प्रसूत मातेला जीवदान दिल्यामुळे डॉक्टरांच्या रूपात माणसातल्या देवदुतांचे पुन्हा दर्शन घडले आहे. डॉ.निलेश लाड व डॉ.पराग पगार यांना डॉ. दीपक बहिरम, क्रांती घाडी, अर्चना अघाव, वर्षा भोये, नयना हरिणखेडे यांचे सहकार्य लाभले.

हेही वाचा > पोलिसांच्या नाकावर टिच्चून अवैधरित्या वाहतूक; औरंगाबाद-अहवा महामार्गावरील धक्कादायक प्रकार

सदर महिला रुग्ण रुग्णालयात दाखल होताच बेशुद्ध झाली होती. तत्काळ योग्य उपचार केल्याने मोठ्या शस्त्रक्रियेचा धोका टळून रुग्णाचे प्राण वाचवण्यात यश आले. - डॉ.निलेश लाड, वैद्यकिय अधीक्षक, उपजिल्हा रुग्णालय कळवण.

हेही वाचा > माजी सरपंचाच्या पुतण्याचा खून; नदीपलीकडे मृतदेह सापडल्याने परिसरात खळबळ

संपादन - किशोरी वाघ