esakal | थराराक! सिग्नलवर पोलीसांनी हटकले अन् बस्स..तिथेच उभा होता 'त्याचा' 'काळ'
sakal

बोलून बातमी शोधा

subhash gangurde 1.png

सुभाष गांगुर्डे हे दुचाकीवरून नातेवाइकांच्या कार्यक्रमासाठी पिंपळगाव येथे गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर सुभाष जांबुटके येथे गेले. त्या ठिकाणाहून नाशिककडे पेठ रोडने परतत असताना सायंकाळी साडेपाच ते पावणेसहाच्या सुमारास राऊ सिग्नल चौफुलीवर पोलिसांनी हटकले; आणि बस्स तिथेच त्याचा काळ उभा होता..

थराराक! सिग्नलवर पोलीसांनी हटकले अन् बस्स..तिथेच उभा होता 'त्याचा' 'काळ'

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / म्हसरूळ : सुभाष गांगुर्डे हे दुचाकीवरून नातेवाइकांच्या कार्यक्रमासाठी पिंपळगाव येथे गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर सुभाष जांबुटके येथे गेले. त्या ठिकाणाहून नाशिककडे पेठ रोडने परतत असताना सायंकाळी साडेपाच ते पावणेसहाच्या सुमारास राऊ सिग्नल चौफुलीवर पोलिसांनी हटकले; आणि बस्स तिथेच त्याचा काळ उभा होता..

असा घडला प्रकार
सुभाष गांगुर्डे हे हिरो स्प्लेंडर (एमएच 15, एफई 4910)वरून नातेवाइकांच्या कार्यक्रमासाठी पिंपळगाव येथे गेले होते. कार्यक्रम संपल्यानंतर सुभाष जांबुटके येथे गेले. त्या ठिकाणाहून नाशिककडे पेठ रोडने परतत असताना सायंकाळी साडेपाच ते पावणेसहाच्या सुमारास राऊ सिग्नल चौफुलीवर पोलिसांनी हटकले; परंतु सुभाष यांच्या गाडीचा वेग जास्त असल्याने ते नाकाबंदीसाठी लावलेल्या बॅरिकेड्‌सला धडकून दुचाकीवरून पडले आणि काही क्षणातच त्यांचा मृत्यू झाला. याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला.  

हेही वाचा > वाह! पोलिसदादा मनचं जिंकलं की हो...वेळप्रसंगी फावडं घेऊन थेट लागले कामाला!

येथील राऊ सिग्नल चौफुलीवर बुधवारी (ता. 6) सायंकाळी नाकाबंदीसाठी लावलेल्या बॅरिकेड्‌सला धडकून दुचाकीस्वार जागीच ठार झाला. सुभाष साहेबराव गांगुर्डे (वय 34, मूळ जांबुटके, ता. दिंडोरी, नाशिक, हल्ली मुक्काम हनुमानवाडी, पंचवटी) असे अपघातात ठार झालेल्या व्यक्तीचे नाव आहे. 

हेही वाचा > अचानक आगीच्या ज्वाला आकाशात उठल्या...सगळ्यांचाच उडाला थरकाप!

go to top