
वडाळानाका परिसरात एका बंगल्याच्या मालकाला अचानक आगीच्या ज्वाला व काळाकुट्ट धूर आकाशात उठू लागल्याचे दिसले. सदर प्रकार बघून सगळ्यांचाच थरकाप उडाला नेमकं काय अन् कसं झालं काहीच कळेना...आगीच्या लपट्यात बंगल्याच्या आवारात असलेले लाकडी फर्निचरही जळाले. ही घटना घडली मोठा राजवाडा परिसराजवळ मुख्य रस्त्यावर असलेल्या मलेक मेन्शन नावाच्या बंगल्यात सविस्तर घटना अशी की...
नाशिक : वडाळानाका परिसरात एका बंगल्याच्या मालकाला अचानक आगीच्या ज्वाला व काळाकुट्ट धूर आकाशात उठू लागल्याचे दिसले. सदर प्रकार बघून सगळ्यांचाच थरकाप उडाला नेमकं काय अन् कसं झालं काहीच कळेना...आगीच्या लपट्यात बंगल्याच्या आवारात असलेले लाकडी फर्निचरही जळाले. ही घटना घडली मोठा राजवाडा परिसराजवळ मुख्य रस्त्यावर असलेल्या मलेक मेन्शन नावाच्या बंगल्यात सविस्तर घटना अशी की...
अशी आहे घटना
भद्रकाली पोलीस ठाणे हद्दीतील वडाळानाका येथील मोठा राजवाडा परिसराजवळ मुख्य रस्त्यावर असलेल्या मलेक मेन्शन नावाच्या बंगल्यात अगदी बंगल्यांच्या भिंतीला लागून उभ्या असलेल्या मिनी टेम्पोने (एम.एच.१५ एसक्यू ९२४४) अचानकपणे बुधवारी (दि. ६) सायंकाळी पेट घेतला. अवघ्या काही मिनिटांतच टेम्पो पुढील बाजूने आगीच्या संपुर्णपणे भक्ष्यस्थानी पडला. यामुळे बोळीत असलेले लाकडी फर्निचरही पेटण्यास सुरूवात झाली. आगीच्या ज्वाला व काळाकुट्ट धूर आकाशात उठू लागल्याने बंगला मालकाने तत्काळ शिंगाडा तलाव येथील अग्निशमन दलाच्या मुख्यालयात संपर्क साधून मदत मागितली.
हेही वाचा > पोल्ट्री फार्मवर सकाळी गेलेला युवक रात्री परतलाच नाही..भावाने फार्मच्या फटीतून पाहिले तर धक्काच!
घटनेची माहिती मिळताच अवघ्या हाकेच्या अंतरावर असलेल्या घटनास्थळी लिडिंग फायरमन इकबाल शेख, फायरमन तौसीफ शेख, घनश्याम इंफाळ, उदय शिर्के, अनिल गांगुर्डे हे एक बंबाच्या सहाय्याने अवघ्या दोन मिनिटांत दाखल झाले. बंबचालक देविदास इंगळे यांनी तत्काळ घटनास्थळ गाठले व जवानांनी पाण्याचा मारा करून आग विझविली. संध्याकाळी पावणे पाच वाजता आग लागली. अवघ्या अर्ध्या तासात आग विझविण्यास जवानांना यश आले.
हेही वाचा > "चहापाणी घ्या पण आम्हाला जाऊ द्या साहेब! कारमधील चौघांनी दाखवले पोलीसांना आमिष..अन् झाला मोठा खुलासा