मद्याच्या होम डिलेव्हरीला 'या' ठिकाणाहून सर्वाधिक मागणी..पहिल्याच दिवशी चक्क इतकी नोंदणी  

सकाळ वृत्तसेवा 
Saturday, 16 May 2020

तिसऱ्या टप्यातील लॉकडाऊनमध्ये कंटेंमेंट झोन व मुंबई महापालिका, मालेगाव यांसाह अन्य विविध संवेदनशील ठिकाणे वगळता उर्वरित राज्यभरात मद्य विक्री दुकाने उघडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. यानंतर पहिल्याच दिवशी दुकानांसमोर मोठ्या रांगा लागल्याने व मद्य मिळविण्यासाठी झुंबड उडाल्याने यामुळे कोरोनाचा संसर्ग आणखी वाढेल अशी चिंता व्यक्‍त केली जात होती. यावर तोडगा म्हणून टोकन पद्धतीने मद्य विक्रीचा निर्णय घेतला होता. 

नाशिक : कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी जाहीर लॉकडाऊनमध्ये मद्य विक्री दुकान बंद ठेवलेले होते. त्यातच तिसऱ्या टप्यातील लॉकडाऊनमध्ये ही दुकाने उघडण्याचा निर्णय घेतल्यानंतर राज्यभरात मद्य खरेदीसाठी मोठी गर्दी झाली होती. यावर तोडगा म्हणून मद्याची होम डिलेव्हरी करण्याचा निर्णय घेतला होता. याची अमलबजावणी सुरू झाल्यावर शुक्रवारी (ता.15) पहिल्याच दिवशी राज्यात 5 हजार 434 ग्राहकांनी ऑनलाईन मद्याला मागणी केली. त्यापैकी नव्वद टक्‍के ग्राहक नागपूर, लातूर या जिल्ह्यातील होते. 

यामुळे कोरोनाचा संसर्ग आणखी वाढेल याची चिंता

तिसऱ्या टप्यातील लॉकडाऊनमध्ये कंटेंमेंट झोन व मुंबई महापालिका, मालेगाव यांसाह अन्य विविध संवेदनशील ठिकाणे वगळता उर्वरित राज्यभरात मद्य विक्री दुकाने उघडण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला होता. यानंतर पहिल्याच दिवशी दुकानांसमोर मोठ्या रांगा लागल्याने व मद्य मिळविण्यासाठी झुंबड उडाल्याने यामुळे कोरोनाचा संसर्ग आणखी वाढेल अशी चिंता व्यक्‍त केली जात होती. यावर तोडगा म्हणून टोकन पद्धतीने मद्य विक्रीचा निर्णय घेतला होता. 

हेही वाचा > ह्रदय पिळवटून टाकणारी घटना..अखेर सुटलाच 'त्या' मजुरांचा धीर.. रोजच्या मरणातून सोडवला जीव एकदाचा

पहिल्याच दिवशी साडे पाच हजार इच्छुकांची नोंदणी 
यानंतर होम डिलेव्हरीचा पर्यायदेखील उपलब्ध करून दिला होता. परवाना असलेल्या ग्राहकांच अशा स्वरूपात मद्य खरेदी करण्याची अट घातली होती. या सेवेला शुक्रवारी (ता.15) सुरवात होताच पहिलयाच दिवशी राज्यात 5434 ग्राहकांनी नोंदणी केली होती. त्यांना त्यांना घरपोच मद्यसेवा देण्यात आली आहे. त्यापैकी प्रामुख्याने नागपूर व लातूर या दोन जिल्ह्यातील ग्राहक संख्या 4875 होती. 

हेही वाचा > राजेंद्र सरदार खून प्रकरण..अखेर गुढ उलघडले ! प्रियकराच्या मदतीने काढला कायमचा काटा

27 जिल्ह्यात मद्य विक्री सुरू 
सद्य स्थितीत राज्यातील 27 जिल्ह्यांमध्ये किरकोळ मद्यविक्री सुरू आहे. तर अद्यापपर्यंत औरंगाबाद, बीड व नांदेड येथे मद्यविक्री दुकाने बंद ठेवलेली आहेत. तर मुंबई शहर, मुंबई उपनगर व उस्मानाबाद येथे मद्य विक्री दुकाने सुरू केल्यानंतर परीस्थितीचा अंदाज घेता दुकाने बंद ठेवण्याचा निर्णय घेतलेला आहे.  
 
स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home delivery of alcohol most demanded nashik marathi news