'होम क्वारंटाइन' असलेल्यांची यादी व्हायरल?...दोषींविरुद्ध कठोर कारवाई

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 9 एप्रिल 2020

(मनमाड) येथे कोरोनाच्या धर्तीवर होम क्वारंटाइन केलेल्या नागरिकांची गोपनीय यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली. यादीत समाविष्ठ नागरिकांना संशयाच्या नजरेने पाहिले जाण्याचा धोका निर्माण झाला असून, यादी व्हायरल करणाऱ्यांची येथील पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, शहरात एकही कोरोनाचा रुग्ण नसल्याचे मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळविले आहे. 

नाशिक : (मनमाड) येथे कोरोनाच्या धर्तीवर होम क्वारंटाइन केलेल्या नागरिकांची गोपनीय यादी सोशल मीडियावर व्हायरल झाली. यादीत समाविष्ठ नागरिकांना संशयाच्या नजरेने पाहिले जाण्याचा धोका निर्माण झाला असून, यादी व्हायरल करणाऱ्यांची येथील पोलिसांनी चौकशी सुरू केली आहे. दरम्यान, शहरात एकही कोरोनाचा रुग्ण नसल्याचे मुख्याधिकारी डॉ. दिलीप मेनकर यांनी प्रसिद्धीपत्राद्वारे कळविले आहे. 

170 व्यक्तींना होम क्वारंटाइन

कोरोना संसर्ग रोखण्यासाठी पालिका, उपजिल्हा रुग्णालय, पोलिस सर्वतोपरी उपाययोजना करीत आहेत. विविध शहरांतून मनमाडमध्ये आलेल्या नागरिकांची, तसेच उपजिल्हा रुग्णालयात तपासणी केलेल्या काही रुग्णांची यादी तयार करण्यात आली होती. आतापर्यंत 170 व्यक्तींना होम क्वारंटाइन केले आहे. यातील 69 व्यक्तींची यादी बाहेर आली. गोपनीय माहिती व्हायरल करणे गंभीर गुन्हा असतानाही काही उतावीळवीरांनी उत्साहाच्या भरात विविध व्हॉट्‌सऍप ग्रुपवर ही यादी व्हायरल केली.

हेही वाचा > अहो काय सांगता, स्पर्श न होता उघडणार दार?...'या' विद्यार्थ्यांनी लढविली अनोखी शक्कल
 
यादी व्हायरल करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई

व्हॉट्‌सऍप ग्रुपवर काही लोक यादी व्हायरल करीत आहेत. शहरात एकही व्यक्ती कोरोनाबाधित नाही. होम क्वारंटाइन केलेल्यांपासून कोणासही धोका नाही. केवळ सुरक्षित उपाययोजना म्हणून सार्वजनिक हितास्तव त्यांना होम क्वारंटाइन केले असून, यादी व्हायरल करणाऱ्याविरुद्ध कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचे डॉ. मेनकर यांनी सांगितले.  

हेही वाचा > "कोरोना व्हायरस''चा ऑनलाइन जगतातही संसर्ग...सावध व्हा!...कारण


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Home Quarantine List Viral; Strict action against the guilty nashik marathi news