अनेक राजकारणी आले आणि गेले मात्र मनमाडकरांच्या पदरी निराशाच!

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जून 2020

शासकीय कामे रेंगाळत असल्याने पुन्हा चकरा माराव्या लागतात. त्यात आर्थिक, मानसिक त्रास होतो. शहर मध्यवर्ती असतानाही तालुकानिर्मितीचा विषय केवळ निवडणुकीत चर्चेला येतो आणि पुन्हा मागे पडतो. येथील प्रशासकीय कामांचा विचार करता तालुकानिर्मिती होत नाही तोपर्यंत अपर तहसीलदारांची नेमणूक करून कार्यालय सुरू करण्याची मागणी स्थानिकांनी वारंवार केली आहे. 

नाशिक : (मनमाड) अनेक राजकारणी आले आणि गेले मात्र आश्‍वासना पलीकडे काहीदेखील मनमाडकरांसाठी मिळाले नाही. त्यामुळे वर्षानुवर्षे मनमाडकरांना तालुकानिर्मितीची आस लागली आहे. जिल्ह्यात तिसऱ्या क्रमांकाचे आणि चांगले महसूल देणारे शहर असले तरी येथे एकही शासकीय कार्यालय नाही. तहसील कार्यालय नसल्याने विद्यार्थी, कामगार आणि नागरिकांना महसुली कामासाठी येथून 24 किलोमीटरवरील नांदगाव तहसील, त्यापुढे 25 किलोमीटरवरील येवला प्रांत, तर 100 किलोमीटरवरील नाशिक जिल्हाधिकारी कार्यालयात जावे लागते.

मनमाडकरांच्या तोंडाला पाने पुसली
 
तालुकानिर्मितीचा प्रश्‍न अनेक वर्षांपासून रेंगाळत ठेवून जनतेला विकासाची संधी नाकारत शहराचा विकास खुंटला असल्याने शहरातील राजकीय पदाधिकारी आणि सर्वसामान्य नागरिकांचे म्हणणे आहे. मंजूर असलेल्या अपर तहसील कार्यालयालाही खो बसल्याने मनमाडकरांच्या तोंडाला पाने पुसली आहेत. शासकीय कामे रेंगाळत असल्याने पुन्हा चकरा माराव्या लागतात. त्यात आर्थिक, मानसिक त्रास होतो. शहर मध्यवर्ती असतानाही तालुकानिर्मितीचा विषय केवळ निवडणुकीत चर्चेला येतो आणि पुन्हा मागे पडतो. येथील प्रशासकीय कामांचा विचार करता तालुकानिर्मिती होत नाही तोपर्यंत अपर तहसीलदारांची नेमणूक करून कार्यालय सुरू करण्याची मागणी स्थानिकांनी वारंवार केली आहे. 

 हेही वाचा > सावध व्हा...'हा' आजार पडेल महागात...कोरोनाचे व्हाल बळी!

अपर तहसील कार्यालयासाठी आंदोलने केली. प्रशासकीय मंजुरी देऊन अपर तहसील सुरू करू, असे आश्‍वासन दिले. मात्र शासकीय आणि मंत्रिमंडळ मान्यता नाही, असे सांगत आजही प्रश्‍न प्रलंबित आहे. अनेकदा पाठपुरावा केला आता प्रत्यक्षात कार्यालय सुरू होणे गरजेचे आहे. - अशोक परदेशी, प्रमुख मनमाड बचाव कृती समिती 

गेल्या अनेक वर्षांपासून मनमाड तालुक्‍याची मागणी प्रलंबित आहे. मालेगाव, चांदवड व येवला तालुक्‍यातील जवळपास 15 किलोमीटरची खेडी मनमाडशी जोडली गेली आहेत. दळणवळण व भौगोलिकदृष्ट्या हे सर्वांना सोयीचे ठिकाण आहे. मनमाड तालुका झाल्यास येथेच महसुली कामे होण्याची सोय होईल. त्यामुळे वेळ, पैसा व प्रवासाचा त्रासही वाचेल. - संजय कटारे, समाजसेवक  

हेही वाचा > ह्रदयद्रावक! सकाळी हसतमुख दिसलेल्या लेकीची दुपारी डेडबॉडीच...आईने फोडला हंबरडा

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Hope of taluka formation over the years; Manmadkar's grief over government work nashik marathi news