BREAKING : अक्षय कुमारला हेलिकॉप्टरची परवानगी कशी? छगन भुजबळ यांचे चौकशीचे आदेश

सकाळ वृत्तसेवा
Saturday, 4 July 2020

अक्षय कुमारला हवाई, मुक्कामासाठी रिसॉर्ट मिळालेच कसे? ग्रामीण ऐवजी सिटी पोलिसांनी अक्षयकुमारला प्रोटेकशन कसे दिले याची चौकशी करणार असल्याचे भुजबळ यावेळी म्हणाले. ग्रामीण भाग असताना अक्षय कुमारला शहर पोलिसांचा एसकोर्ट कसा ..? असा प्रश्नही भुजबळ यांनी केला असून त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले   .

नाशिक : मुख्यमंत्र्यांपासून सगळे मंत्री गाडीतून फिरत असताना, अक्षय कुमारला हेलिकॉप्टरची परवानगी कशी ? असे सांगत पालकमंत्री छगन भुजबळ यांचे चौकशीचे आदेश दिले आहेत. नियम डावलून अक्षय कुमारला व्ही आय पी ट्रीटमेंटचा प्रकार हा धक्कादायक असल्याचे यावेळी छगन भुजबळ यांनी सांगितले. नाशिकमध्ये राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री तसेच पालकमंत्री छगन भुजबळ यांनी पत्रकार परिषद घेतली. त्यावेळी ते बोलत होते.

अक्षय कुमारला हवाई, मुक्कामासाठी रिसॉर्ट मिळालेच कसे? - भुजबळ

बॉलीवूड स्टार अक्षय कुमार नुकताच नाशिकदौऱ्यावर आला होता. त्र्यंबकेश्‍वरला हेलिकॉप्टरने दाखल होतांना अक्षय एक दिवस मुक्‍कामी राहिला होता. नाशिकमध्ये दाखल झाल्याचे अक्षयचे छायाचित्र व्हायरल होताच चाहत्यांमध्ये उत्सुकता निर्माण झाली होती. अक्षय कुमारला हवाई, मुक्कामासाठी रिसॉर्ट मिळालेच कसे? ग्रामीण ऐवजी सिटी पोलिसांनी अक्षयकुमारला प्रोटेकशन कसे दिले याची चौकशी करणार असल्याचे भुजबळ यावेळी म्हणाले. ग्रामीण भाग असताना अक्षय कुमारला शहर पोलिसांचा एसकोर्ट कसा ..? असा प्रश्नही भुजबळ यांनी केला असून
त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांना चौकशीचे आदेश दिले   ..

अक्षय कुमारला मार्शल आर्ट व मेडिटेशन इन्स्टिट्यूट सुरू करायची

सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार अक्षय कुमारला मार्शल आर्ट व मेडिटेशन इन्स्टिट्यूट सुरू करायची आहे. या माध्यमातून त्याला फिटनेस फंडा तरूणाईत रूजवायचा आहे. ही इन्स्टिट्यूट सुरू करण्यासाठी तो जागेचा शोध घेत आहे. या पार्श्‍वभुमिवर त्र्यंबकेश्‍वरच्या निसर्गरम्य परीसराची पाहणी करण्यासाठी तो नुकताच दाखल झाला होता. अंजनेरी परीसरातील सपकाळ नॉलेज हब प्रांगणात अक्षय हेलिकॉप्टरने दाखल झाला. तेथे संस्थेचे अध्यक्ष डॉ. रवींद्र सपकाळ यांनी त्याचे स्वागत केले. पाहणी केल्यानंतर अक्षय परीसरातीलच ग्रेप काउंटी रिसॉर्ट येथे मुक्‍कामी थांबला होता. यानंतर तो पुन्हा मुंबईकडे रवाना झाला. दरम्यान सध्या मॉन्सूनच्या पार्श्‍वभुमिवर त्र्यंबकेश्‍वरचे निसर्गरम्य वातावरण अक्षयला खुपच भावल्याचे सांगितले जात आहे.

नाशिकच्या ठक्कर डोम मध्ये 350 बेड ची व्यवस्था..
नाशिकच्या ठक्कर डोम मध्ये कोरोना रुग्णांसाठी 350 बेड ची व्यवस्था करण्यात येणार आहे. तसेच निमा संस्थे तर्फे ऑक्सिजन ची व्यवस्था करणार असल्याची माहिती भुजबळ यांनी दिली. ज्या व्यवस्था कमी पडतील त्या शासनाच्या वतीने केले जाणार..तसेच लोकांना विरोध असला तरी काळजी करण्याची गरज नाही.असेही भुजबळ म्हणाले.

हेही वाचा > भयंकर..आमरस खाण्यासाठी नाशिकच्या पाहुण्यांना खास निमंत्रण..अन् तिथेच झाला घात..! गावात दहशत..

काय म्हणाले भुजबळ?

-अधिकची सोय करून ठेवण्याची गरज..
शहरातील रुग्णालयात पुरेशा जागा शिल्लक आहेत
मात्र आपत्कालीन व्यवस्था म्हणून ही व्यवस्था..
खाजगी हॉस्पिटलचे अधिक्कार जिल्हाधिकारी आणि आयुक्तांना..
कर्फ्यु ला मिळालेला प्रतिसाद बघून लॉक दाऊनचा निर्णय घेऊ- महाविकास आघाडीत वाद नाही. मुख्यमंत्री सर्वांना विश्वासात घेतात.
हेही वाचा >  सोसायटीचे कर्ज..लहान बहिणीचे लग्न..लहान वयातच जबाबदारीचं ओझं..एका भावाची नशिबाशी झुंज अपयशी..


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: How did Akshay Kumar get permission for the helicopter? Chhagan Bhujbal's inquiry order nashik marathi news