esakal | #Lockdown : 'ताई, खूप दिवसांनी घरचं जेवण मिळालं!'...अन् 'त्या' पोलिसांचे डोळे पाणावले
sakal

बोलून बातमी शोधा

police.jpg

"ताई, खूप दिवसांनंतर आज गरमागरम व घरचे जेवण मिळाले,' हे उद्‌गार आहेत मालेगावात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तैनात असलेल्या राज्य राखीव दलाच्या पोलिस जवानांचे... येथील शिवसेना महिला आघाडीतर्फे बंदोबस्तासाठी आपले कर्तव्य बजावत असणाऱ्या पोलिसांना घरगुती जेवणाचे डबे देण्यात आले. 

#Lockdown : 'ताई, खूप दिवसांनी घरचं जेवण मिळालं!'...अन् 'त्या' पोलिसांचे डोळे पाणावले

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : (मालेगाव) "ताई, खूप दिवसांनंतर आज गरमागरम व घरचे जेवण मिळाले,' हे उद्‌गार आहेत मालेगावात कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवर तैनात असलेल्या राज्य राखीव दलाच्या पोलिस जवानांचे... येथील शिवसेना महिला आघाडीतर्फे बंदोबस्तासाठी आपले कर्तव्य बजावत असणाऱ्या पोलिसांना घरगुती जेवणाचे डबे देण्यात आले. 

शंभर पोलिसांसह गरीब व गरजू लोकांना जेवणाची सोय 

लॉकडाउन झाल्यानंतर प्रत्येक शहरात पोलिसांच्या मदतीला राज्य राखीव पोलिस दलाचे जवान तैनात आहेत. शिवसेना जिल्हा महिला जिल्हाप्रमुख संगीता चव्हाण यांनी महिला आघाडीतर्फे सर्व पोलिसांना जेवण देण्यात आले. यामध्ये चर्चपासून रावळगाव नाका, मोसम पूल, पेट्रोलपंप, आंबेडकर पुतळा, शिवाजी पुतळा, अप्सरा हॉटेल, नवा स्टॅन्ड या भागात कर्तव्य बजावत असणाऱ्या शंभर पोलिसांसह गरीब व गरजू लोकांना जेवणाची सोय करून दिली. प्रशासनाचे सर्व नियम पाळून कोणतीही गर्दी न करता सोशल डिस्टन्स ठेवून, मास्क लावून पोलिसांना जेवण दिले. 

हेही वाचा > रक्ताच्या थारोळ्यात बेशुद्ध अवस्थेत पडलेल्या 'त्या' अनोळखी तरुणाच्या मदतीला देवदूतासारखा धावून आला!

या वेळी उपशहर संघटक सोनाली धात्रक, शाखाप्रमुख अंजली कायस्थ, तालुकाध्यक्ष अनिता सोनवणे यांनी संयोजन केले.  

हेही वाचा > #Lockdown : 'बाहेर निघू नका, पोलीस खेळताय खरोखरचा पब्जी!'...कामगिरीचं होतंय कौतुक

go to top