Gram Panchayat Results : इगतपुरीत शिवसेनेची जोरदार मुसंडी! प्रस्थापितांना धक्का

पोपट गंवादे
Monday, 18 January 2021

तहसीलदार कार्यालयात तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (ता.१८) मतमोजणी प्रसंगी उमेदवारांच्या समर्थकांची मोठी गर्दी होती. कोण बाजी मारणार, गावाच्या राजकारणात कोण ठरणार बाजीगर, याबद्दल उत्कंठा होती. 

इगतपुरी शहर (नाशिक) : तालुक्यात आठ ग्रामपंचायतींच्या निवडणुकांचे आश्‍चर्यकारक निकाल लागले. ज्या ग्रामपंचायतींच्या निकालाकडे लक्ष लागले होते त्या पंचायतीत प्रस्थापितांना धक्का बसला. तालुक्यातील आठपैकी पाच ग्रामपंचायतीत शिवसेनेने जोरदार मुसंडी मारली. तहसीलदार कार्यालयात तहसीलदार परमेश्वर कासुळे यांच्या मार्गदर्शनाखाली सोमवारी (ता.१८) मतमोजणी प्रसंगी उमेदवारांच्या समर्थकांची मोठी गर्दी होती. कोण बाजी मारणार, गावाच्या राजकारणात कोण ठरणार बाजीगर, याबद्दल उत्कंठा होती. 

विजयी उमेदवारांत युवकांचा भरणा अधिक

संवेदनशील तळोघ ग्रामपंचायतीत आश्चर्यकारक निकाल लागताच जल्लोष करण्यात आला. पंचायत समिती शिवसेनेचे गटनेते विठ्ठल लंगडे यांच्या नेतृत्वाखाली पॅनेलने ९ पैकी ९ जागांवर बाजी मारत विरोधकांना नेस्तनाबूत केले. विजय जाहीर होताच तळोघ उमेदवार, समर्थक व ग्रामस्थांनी घाटनदेवी येथे जाऊन विजयाचा नारळ वाढवून आनंदोत्सव साजरा केला. शेणवड खुर्द ग्रामपंचायतीत माजी आमदार शिवराम झोले यांचे समर्थकांचे पॅनल नेस्तनाबूत झाले. विजयी उमेदवारांत युवकांचा भरणा अधिक होता. महिलांचाही सहभाग चांगला होता. मात्र, गावपातळीवर सर्वच ठिकाणी युवकांचे नेतृत्वावर शिक्कामोर्तब झाल्याचे चित्र पहावयास मिळाले. तर टिटोली ग्रामपंचायतची बिनविरोध पार पडली होती. 

हेही वाचा > ऐनसंक्रांतीच्या सणाला घरावर ओढावली 'संक्रांत'; लेकाला उराशी धरुन मातेचा जीवघेणा आक्रोश

ग्रामपंचायत व विजयी झालेले उमेदवार 

तळोघ : भारत भगत, सुरू भगत, सपना लंगडे, संतू भगत, जनार्धन लंगडे, ताईबाई भगत, भगीरथ कडू, शीतल भगत, हिराबाई गोईकने. 
कुर्नोली : मदन तेलम, वनिता जोशी, रंगनाथ जोशी. 
बलायदुरी : हिरामण दुभाषे, ज्योती भगत, आश्विनी भगत. 
शेणवड खुर्द : केशव वारघडे, चंदा वारघडे, सीता वारघडे, योगेश दराने, कोमल वारघडे, नीलेश गवारी, ज्योती ढगे. 
गरुडेश्वर : संपत पोटकुळे, निर्मला पोटकुले, श्रीराम बोटे, रेश्मा बेंडकुळे, वेणू बोटे. 
फांगुळगव्हाण : आतिष पंडित, ईश्वर चव्हाण, अनिता म्हसने. 
भरविर बु : नवनाथ झनकर, खंडेराव झनकर, सावित्रीबाई झनकर, दत्तात्रय झनकर, पुंजा जुंदरे, कमलाकर सांबरे, ताराबाई सांबरे, संगीता घोरपडे सुधाकर मदगे, द्रौपदा चौरे, सारिका मदगे. 

हेही वाचा > ढोंगीबाबाचा कारनामा! आधी खड्याचा केला रुद्राक्ष अन् नंतर केले असे काही; रवानगी थेट पोलिस ठाण्यातच

 
 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: igatpuri gram panchayat election nashik marathi news