esakal | रात्रीस खेळ चाले!...रात्री ट्रॅक्‍टर तर दिवसा बैलगाडीने होताय हे धंदे...
sakal

बोलून बातमी शोधा

valu chori.jpg

(मालेगाव) शहराच्या मध्यातून जाणाऱ्या मोसम नदीपात्रातून बेकायदा वाळू उपसा केला जात आहे. वडनेर ते हिंमतनगरपर्यंतच्या नदीपात्रातून ठिकठिकाणी रात्री वाळूची चोरी होत आहे. रात्री ट्रॅक्‍टरच्या सहाय्याने, तर दिवसा बैलगाडीने वाळूचोरीचा फंडा अवलंबिला जात आहे. मार्चअखेरच्या करवसुलीत महसूल प्रशासन व्यस्त असतांना, वाळूचोर राजरोसपणे वाहतूक करीत आहेत. 

रात्रीस खेळ चाले!...रात्री ट्रॅक्‍टर तर दिवसा बैलगाडीने होताय हे धंदे...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : (मालेगाव) शहराच्या मध्यातून जाणाऱ्या मोसम नदीपात्रातून बेकायदा वाळू उपसा केला जात आहे. वडनेर ते हिंमतनगरपर्यंतच्या नदीपात्रातून ठिकठिकाणी रात्री वाळूची चोरी होत आहे. रात्री ट्रॅक्‍टरच्या सहाय्याने, तर दिवसा बैलगाडीने वाळूचोरीचा फंडा अवलंबिला जात आहे. मार्चअखेरच्या करवसुलीत महसूल प्रशासन व्यस्त असतांना, वाळूचोर राजरोसपणे वाहतूक करीत आहेत. 

रात्री ट्रॅक्‍टरने वाळू वाहून नेली जातेय

काही दिवसांपासून वाळूचोरांनी मोसम नदी केंद्रित केली आहे. बैलगाडीने नदीपात्रातून वाळू वाहतूक करून नजीकच एका ठिकाणी जमविली जाते. तेथून रात्री ट्रॅक्‍टरने वाळू वाहून नेली जाते. गिरणा नदीपात्रातील बहुतांश भागात पाणी आहे. त्यामुळे मोसमच्या वाळूवर लक्ष केंद्रित करण्यात आले आहे. गेल्या वर्षी झालेल्या समाधानकारक पावसामुळे गिरणा, मोसमसह तालुक्‍यातील सर्व लहान-मोठ्या नद्यांना पूर आला. परिणामी, नदीकाठच्या विहिरींना त्याचा मोठा फायदा झाला. वाळूचोरांकडून तालुक्‍यातील इतर लहान नद्याही केंद्रित करण्यात आल्या आहेत. 

हेही वाचा > धक्कादायक! आई - वडील रागविले म्हणून त्याने घरातून काढला पळ...अन्

काही दिवसांनंतर परिस्थिती पुन्हा "जैसे थे'

ग्रामीण भागात फारसे कोणाचे लक्ष नसते. याचा फायदा घेऊन सर्रास वाळूचोरी होत आहे. मोसम नदीतील वाळूचोरीसंदर्भात वडगाव, भायगाव, निळगव्हाण, अजंग, वडेल, काष्टी आदी गावांतील ग्रामस्थांनी अनेक वेळा तक्रारी केल्या. प्रत्येक वेळी जुजबी कारवाई केली जाते. काही दिवसांनंतर परिस्थिती पुन्हा "जैसे थे' होते. महसूल व पोलिस प्रशासनाच्या आशीर्वादामुळे वाळूचोरी होत असल्याचा आरोप केला जात आहे. बेसुमार वाळू उपसा करून नदीपात्र विद्रूप करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करावी, अशी मागणी नदीकाठच्या ग्रामस्थांनी केली आहे.  

हेही वाचा > घरी येणार होता छोटासा पाहुणा...पण, काळ असा आला की सगळं हिरावून नेलं...

go to top