राज्‍यात हाथरससारख्या घटना रोखण्यासाठी ‘दिशा कायदा’ लागू करा

अरुण मलाणी
Tuesday, 6 October 2020

हाथरसमधील सामूहिक बलात्काराची घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. महाराष्ट्रातही ठिकठिकाणी नराधमांकडून महिला व युवतींवर अत्याचाराच्या घटना घडत असतात. नराधमांमुळे राज्यातील महिला, युवती सुरक्षित नाहीत.

नाशिक : महाराष्ट्रात हाथरससारखी घटना घडू नये आणि नराधमांना कायद्याचा वचक बसावा, यासाठी आंध्र प्रदेश सरकारप्रमाणे राज्यात तत्काळ ‘दिशा कायदा’ लागू करावा, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य पोलिस सेवा संघटनेच्या महिला प्रदेशाध्यक्ष व ‘सकाळ’च्या तनिष्का व्यासपीठाच्या सदस्या कीर्ती जाधव यांनी नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक प्रतापराव दिघावकर, जिल्हाधिकारी सूरज मांढरे व पोलिस आयुक्त दीपक पांडे यांना सोमवारी (ता.५) निवेदन दिले. 

महाराष्ट्र पोलिस सेवा संघटना महिला अध्यक्षा र्कीती जाधव यांनी दिलेल्या निवेदनात म्‍हटले आहे, की हाथरसमधील सामूहिक बलात्काराची घटना माणुसकीला काळिमा फासणारी आहे. महाराष्ट्रातही ठिकठिकाणी नराधमांकडून महिला व युवतींवर अत्याचाराच्या घटना घडत असतात. नराधमांमुळे राज्यातील महिला, युवती सुरक्षित नाहीत. अशा प्रकारचा गुन्हा घडल्यानंतर न्यायालयात वर्षानुवर्षे तपास, सुनावणी सुरू असते. त्यामुळे गुन्हेगारांवर कायद्याचा धाक राहिलेला नाही. महाराष्ट्रातही आंध्र प्रदेशाप्रमाणे कठोर कायदा लागू करावा, अशी जनतेची मागणी आहे. नाशिक जिल्हाध्यक्ष अविनाश काजळे, उपाध्यक्ष गणेश गायधनी, इगतपुरी तालुकाध्यक्ष सतीश जाधव, संकेत भंगाळे, घनश्याम जाधव, विद्या मानकर, वंदना सोनवणे, आशा भदाणे आदी पदाधिकारी उपस्थित होते. 

हेही वाचा > गुजरातहून औरंगाबादला पोहचवायचे होते 'घबाड'; पोलिसांच्या कारवाईने फिस्कटला प्लॅन


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Implement Disha Act in the state to prevent hathras nashik news