esakal | भावनिक मेसेज वाचून मदत करायला जात असाल तर सावधान! बातमी तुमच्यासाठी
sakal

बोलून बातमी शोधा

whatsapp grp.jpg

कोरोनाच्या संकटकाळाचा गैरफायदा घेऊन फेसबुक मॅसेजवरून हिंदीतून ‘मेरे फ्रेंड की लडकी ज्यादा सीरियस है, मुझे पाच हजार रुपये चाहिए। कल शाम तक लौटा दूंगा । जल्दी करना यार’, असे मॅसेज पाठवून फसवणुकीचे प्रकार गिरणारे भागात घडत आहेत.

भावनिक मेसेज वाचून मदत करायला जात असाल तर सावधान! बातमी तुमच्यासाठी

sakal_logo
By
विनोद बेदरकर

नाशिक / गिरणारे : कोरोनाच्या संकटकाळाचा गैरफायदा घेऊन फेसबुक मॅसेजवरून हिंदीतून ‘मेरे फ्रेंड की लडकी ज्यादा सीरियस है, मुझे पाच हजार रुपये चाहिए। कल शाम तक लौटा दूंगा । जल्दी करना यार’, असे मॅसेज पाठवून फसवणुकीचे प्रकार गिरणारे भागात घडत आहेत.

भावनिक मॅसेजद्वारे फसवणुकीत वाढ 

सायबर क्राइमला तक्रार करण्यास लोक भीतीपोटी पुढे येत नाही. त्यामुळे सोशल मीडियावर मोठी आर्थिक फसवणूक होऊ शकते. फेसबुक हॅक करून फेसबुक मॅसेंजरवरून पैसे मागण्याचे मेसेज बऱ्याच प्रमाणात येत आहेत. बँकचा खाते क्रमांक, अथवा फोन पे, पेटीएममार्फत पैशांची मागणी होते. फोटोची अदलाबदल करण्याचे प्रकार वाढले आहेत. संबंधित अकाउंट हॅकर्स हॅक करतात. यासाठी पासवर्ड स्ट्राँग ठेवणे, जन्मतारीख, त्याचबरोबर मोबाईल क्रमांक सोशल मीडिया, फेसबुकवर शेअर करू नये, असे आवाहन सोशल मीडियाचे तज्ज्ञ निशांत पांडे यांनी केले आहे.  

हेही वाचा > गुजरातहून औरंगाबादला पोहचवायचे होते 'घबाड'; पोलिसांच्या कारवाईने फिस्कटला प्लॅन

हेही वाचा > ...म्हणून अधिकृत मेडिकलमधूनच खरेदी करा औषधे! रुग्ण व नातलगांना सतर्कतेचा इशारा

go to top