VIDEO: शाळा बंद असली म्हणून काय झालं! चिमुकल्यांचा अनोखा स्वातंत्र्य दिन एकदा बघाच

Independance Day
Independance Day

नाशिक/येवला : देशभक्ती माणसाच्या नसानसांत भिनलेली असली, की त्यासाठी निमित्तच असले असे काही नाही. याचाच प्रत्यय विखरणी (ता. येवला) येथे स्वातंत्र्यदिनी आला. शाळा बंद असली म्हणून काय झाले, असे म्हणत येथील चिमुरड्यांनी थेट बाजरीच्या पिकात तिरंगा उभा करून ‘भारतमाता की जय’च्या जयघोषात स्वातंत्र्य दिन साजरा केला.

स्वातंत्र्य दिवस म्हणजे सर्वधर्मीयांचा सार्वजनिक उत्सव. शाळकरी विद्यार्थ्यांना तर हा दिवस म्हणजे एखाद्या सणासारखाच आनंद देणारा असतो. ध्वजवंदनाचे खास आकर्षण या दिवशी असते. सध्या कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे देशभरातील शाळा अद्याप बंद असल्याने विद्यार्थ्यांवर प्रथमच स्वातंत्र्य दिनाच्या समारंभाला मुकण्याची वेळ आली. मात्र, आपल्या हक्काच्या आनंदाला मुकतील ते विद्यार्थी कसले, याचाच प्रत्यय देत विखरणी येथील अथर्व शरद शेलार, साई शरद शेलार, जान्हवी अरुण शेलार या चिमुकल्यांनी आपल्या शेतातील बाजरीच्या झाडाला तिरंगा बांधून त्याला जोरदार सलामी तर दिलीच, शिवाय बोबड्या शब्दात राष्ट्रगीत म्हणत व भारतमाता की जयच्या घोषणा देऊन स्वातंत्र्य दिन साजरा केला. सोशल मीडियावर जेव्हा हा व्हिडिओ व्हायरल झाला, तेव्हा पाहणाऱ्यांचे मनही सद्‌गदित झाले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com