"कृष्णाचा जन्म जेलमध्ये झाला तेव्हा तुला जेलबाहेर पडायचंय?" सरन्यायाधीश बोबडेंचा आरोपीला प्रश्न; कोर्टात मजेशीर वातावरण

सकाळ वृत्तसेवा
Wednesday, 12 August 2020

सर्वोच्च न्यायालयामध्ये मंगळवारी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी गुन्हेगाराने श्री कृष्ण जन्माष्टमी दिवशी जेलमधून बाहेर पडण्याची परवनगी मागितली होती. त्यावेळेस सरन्यायाधीशांनी थोडी गंमत केली पण नंतर खून खटल्यात जामीनही दिला.

नाशिक : सर्वोच्च न्यायालयामध्ये मंगळवारी सरन्यायाधीश शरद बोबडे यांच्या खंडपीठासमोर सुनावणी झाली. त्यावेळी गुन्हेगाराने श्री कृष्ण जन्माष्टमी दिवशी जेलमधून बाहेर पडण्याची परवनगी मागितली होती. त्यावेळेस सरन्यायाधीशांनी थोडी गंमत केली, पण नंतर खून खटल्यात जामीनही दिला

धर्मेंद्र वळवीची सरन्यायाधीशांनी केली थोडी गंमत

'तुला जेल हवी की बेल?' असा प्रश्न बोबडेंनी विचारला ज्या दिवशी कृष्णाचा जन्म जेलमध्ये झाला तेव्हा तुला जेलबाहेर पडायचंय? असं देखील म्हणाले. हिंदू कथांनुसार, श्रीकृष्णाचा जन्म मथुरेमध्ये एका कारावासामध्ये झाला होता. त्यावेळेस नंदूरबारच्या धर्मेंद्र वळवीची सरन्यायाधीशांनी थोडी गंमत केली. पण नंतर १९९४ च्या मधुकर वरसाळे खून खटल्यात जामीनही दिला.

हेही वाचा > क्रूर नियती! "बाबा..तुमच्या दशक्रियेला नाही येऊ शकले..म्हणून तुमच्याकडेच आले" वडिलांमागे लेकीचीही अंत्ययात्रा

धर्मेंद्र वाळवी असं आरोपीचं नाव मुळचा नंदुरबारचा असून त्याला एका खुनाच्या आरोपाखाली आजन्म कारावासाची शिक्षा झाली आहे. दरम्यान तुझ्याशी धर्माचा काही संबंध नाही म्हणत बोबडे यांनी त्याच्या अर्जाला मंजुरी देत जामीन मंजुर केला आहे. १९९४ साली भाजपा कार्यकर्त्याचा खून केल्याप्रकरणी धर्मेंद्र वाळवी हा कारागृहात शिक्षा भोगत आहे. दरम्यान आता त्याला २५ हजारांच्या दोन जातमुचलक्यावर जामीन देण्यात आला आहे.

हेही वाचा >  थरारक! नांदगाव हत्याकांडाने जाग्या केल्या सुपडू पाटील हत्याकांडच्या स्मृती..आजही ग्रामस्थांमध्ये संतप्त भावना

दरम्यान भगवान श्रीकृष्ण हा विष्णूचा आठवा अवतार असून त्याचा जन्म मथुरेमध्ये झाला. मथुरेत कृष्नाचा मामा कंस याने जानकी आणि वासुदेवाला बंदिवान केले होते. कारण जानकीच्या पोटी जन्म घेणारे ८वे अपत्य कंसाचा नाश करेल अशी आकाशवाणी झाली होती.

 

संपादन - ज्योती देवरे


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: cji bobde askes murder convict while hearing bail nashik marathi news