प्रथमच टपाल रेल्वे पार्सल सेवेतर्फे व्हेंटिलेटरची वाहतूक?...वाचा सविस्तर

IMG-20200612-WA0060.jpg
IMG-20200612-WA0060.jpg
Updated on

नाशिक : मध्य रेल्वे आणि भारतीय टपाल सेवेची संयुक्त सेवा असलेल्या भारतीय टपाल रेल्वे पार्सल सेवा (आरएमएस) तर्फे टपाल सेवेशिवाय या आठवड्यात चक्क व्हेंटिलेटरची अत्यावश्‍यक वाहतूक करण्यात आली. विशेष म्हणजे, अवघ्या दोन व्हेंटिलेटर नागपूरहून मुंबईला 24 तासांत पोचवत रेल्वे टपाल सेवेने जलद व्हेंटिलेटर वाहतुकीचा "डोर टू डोर' सेवेचा विक्रम पूर्ण केला.

डोर टू डोअर सर्व्हिस

नागपुरच्या एका खाजगी संगणक कंपनीने ठाण्यातील प्रादेशिक मनोरूग्णालयात २ व्हेंटिलेटर्स पाठविण्यासाठी प्रथमच टपालच्या आरएमएस सेवेचा वापर झाला. टपालाप्रमाणे घरपेच (डोर टू डोर सर्व्हिस)  24 तासांच्या आत सेवा पूर्ण केली गेली. टपाल विभाग टपाल, तिकीट, मनीआर्डर पेाहेाचविण्याचे काम करता पण प्रथमच व्हेटिंलेटरसारख्या अत्यावश्यक सुविधा पुरविण्याचा विक्रम केला. कोरोना व्हायरस महासाथीच्या वेळी व्हेंटिलेटरचे महत्त्व लक्षात घेता हे पार्सल 8 जूनला बजाजनगर, नागपूर येथून घेण्यात आले  आणि 24 तासात ठाणे येथील मनोरूग्णालयामध्ये पोहोचविण्यात आले. 134 किलो वजनाच्या 6 पॅकेट्सचा समावेश होता यातून आरएमएसला उत्पन्न फारसे नव्हते, परंतु डोर टू डोअर सर्व्हिस ही एक गोष्ट असामान्य आणि विशेष बाब होती.  

नागपूर मुख्य पार्सल पर्यवेक्षक शेखर बालेकर यांनी उपकरणे पाठविण्यासाठी पुढाकार घेतला. कोविड-१९ लॉकडाऊनच्या सद्यस्थितीत, व्यक्ती आणि व्यावसायिक प्रतिष्ठानांना त्यांची आवश्यक आणि मोठ्या आकाराच्या वस्तू पाठविणे कठीण जात असतांना मध्य रेल्वेमार्फत चालविण्यात येणा-या विशेष पार्सल गाड्या आणि महाराष्ट्र पोस्टल सर्कलने भारतीय टपाल सेवा व भारतीय रेल्वेच्या पार्सल सेवा उपलब्ध करून दिली. 

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com