VIDEO : "मालेगावचा द्वेष करणारे आज शहरात कसे?" भर पत्रकार परिषदेत महापौरांकडून खासदारांचा निषेध...नेमके काय घडले?

subhash-bhamre.jpg
subhash-bhamre.jpg

नाशिक / मालेगाव : कोरोनाचा शहरात उद्रेक सुरु असताना मालेगावचे रुग्ण धुळ्याला नको असे वादग्रस्त विधान खासदार डॉ. सुभाष भामरे यांनी केले होते. याबाबत जोरदार टीका झाल्यानंतरही त्यांनी दोन वेळा पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका कायम आहे. मालेगाव मध्यमधील रुग्ण कोरोना संसर्गाकडे दुर्लक्ष करीत असून त्यांना आपला विरोध असल्याची भूमिका स्पष्ट केली होती. धुळे लोकसभा मतदारसंघात मालेगाव मध्य व मालेगाव बाह्य हे दोन्ही मतदारसंघ येतात. खासदार डॉ. भामरे यांचे वक्तव्य शहराचा अवमान करणारे असून त्याबद्दल मोठा वाद निर्माण झाला होता. त्यानंतर मालेगाव येथील विश्रामगृहामध्ये मालेगाव महापालिकेच्या पत्रकार परिषदेत असे काही घडले ज्यामुळे त्यांची भूमिका त्यांच्याच अंगलट आली...नेमके काय घडले?

झाले असे की...
अखिल भारतीय जैन परिषदेने मालेगाव शहरातील कोरोना रुग्णांसाठी बारा रुग्णवाहिका उपलब्ध केल्या आहेत. त्यांच्या या योगदानाबद्दल शांतीलाल मुथा यांच्या आभारासाठी ही पत्रकार परिषद होती. त्याला महापालिका आयुक्त तसेच अन्य अधिकारी उपस्थित होते. याचवेळी इथे धुळ्याचे खासदार डॅा भामरे येथे आले. त्यांनी महापालिका आयुक्तांना बाजूला बोलावले. त्यांच्याशी चर्चा केली. या चर्चेनंतर पत्रकार परिषदेत मांडलेल्या खुर्तीवर बसले. त्याच सुमारास महापौर ताहेरा शेख, कॅांग्रेस नेते, माजी आमदार शेख रशीद तेथे आले. त्यांनी खासदार भामरे यांना पाहून हे दोन्ही नेते चांगलेच संतापले. त्यांनी `हे खासदार इथे कसे?. यांना तर मालेगाव शहर, मालेगावचे कोरोना रुग्ण चालत नाहीत. मग हे इथे कसे आले?` असे म्हणते त्यांनी वाद घालायला सुरवात केली. त्यानंतर त्यांनी खासदार भामरेंचा निषेध करीत तेथून निघून गेले. विश्रामगृहाच्या बाहेर जाऊन त्यांनी पत्रकारांकडे खासदार भामरे यांच्याविषयी नाराजी व्यक्त केली. याच सुमारास महापौर ताहेरा शेख तेथे आल्या. त्यांनीही पत्रकार परिषदेत न जाता परत फिरल्या. यो दोघांनीही खासदारांचा निषेध केला. मालेगाव येथील विश्रामगृहामध्ये मालेगाव महापालिकेच्या पत्रकार परिषदेत आज भाजपचे खासदार डॅा सुभाष भामरे आज अचानक सहभागी झाले. मात्र कालपर्यंत मालेगाव शहराला दुषणे देत मालेगावचे कोरोना रुग्ण धुळे येथे नको अशी भूमिका घेत होते. ते त्यांच्या चांगलेच अंगलट आले. महापौर ताहेर शेख आणि माजी आमदार रशीद शेख खासदार आलेच कसे, असा प्रश्न करीत त्यांचा निषेध केला.. .त्यामुळे भामरे यांना वातावरण तापू लागल्याचे पाहून काढता पाय घ्यावा लागला. शहरात हा सामना आज चर्चेचा विषय ठरला होता

मालेगावविषयी काय म्हणाले होते डॉ. सुभाष भामरे...पाहा...

मालेगावचा द्वेष करणारे आज शहरात कशाला आले? 
धुळे लोकसभा मतदारसंघात मालेगाव मध्य व मालेगाव बाह्य हे दोन्ही मतदारसंघ येतात. खासदार डॉ. भामरे यांचे वक्तव्य शहराचा अवमान करणारे असून त्याबद्दल मोठा वाद निर्माण झाला होता. आज समोरासमोर सामना होताच माजी आमदार शेख यांनी आपल्या भावनांना वाट मोकळी करुन दिली. शहरात हा सामना आज चर्चेचा विषय ठरला होता. यावेळी माजी आमदार रशीद शेख म्हणाले, जेव्हा जगभरात कोरोनाचा हाहाकार माजला होता. तेव्हा स्वतः डॅाक्टर असलेले भामरे मालेगावच्या रुग्णांविषयी अतिशय असंवेदनशील व अशास्त्रीय भूमिका घेत होते. मालेगावचे रुग्ण धुळे येथे नको असे सांगत होते. त्याचवेळी त्यांच्याच भारतीय जनता पक्षाच्या नेत्यांनी मालेगावचे रुग्ण नाशिकला नको अशी भूमिका घेतली होती. मालेगावचा द्वेष करणाऱ्या व्यक्तीबरोबर बसून पत्रकार परिषद घेणे मला मान्य नाही. मालेगावचा द्वेष करणारे आज शहरात कशाला आले? असे त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत डॉ. भामरे यांना त्यांच्या समक्षच सुनावले. 

पत्रकार परिषदेत तणाव

हा वाद वाढत चालल्याचे पाहून खासदार भामरे यांनी त्यांना, राजकारण करु नका अशी प्रतिक्रिया दिली. यामुळे पत्रकार परिषदेत तणाव निर्माण झाला. आयुक्त ञ्यंबक कासार यांनी महापौर, माजी महापौरांची समजूत काढत त्यांना माघारी फिरण्याची विनंती केली. मात्र श्री. व सौ. शेख यांनी खासदारांचा निषेध करीत पत्रकार परिषदेतून काढता पाय घेतला. 

 हेही वाचा > PHOTOS : दुर्दैवी घटना! पोलीस अधिकारीच्या गाडीचा अक्षरश: चेंदामेंदा..सुट्टीनिमित्त घरी जातानाच काळाचा घाला..पाहा
 
खासदारांना कोणी निमंत्रण दिले हे आपणाला माहीत नाही, मात्र याच मतदारसंघाचे खासदार माजी केंद्रीय मंत्री व डॉक्टर असूनदेखील डॉ. भामरे यांनी घेतलेली भूमिका मानवतेच्या दृष्टीकोनातून निषेधार्हच आहे. असे संकुचित विचार असणाऱ्यांबरोबर बसण्यास आपणाला स्वारस्य नाही. खासदारांनी या काळात दिलासा व मदतीचा हात पुढे करण्याची गरज असताना त्यांनी घेतलेली भूमिका निषेधाची व संतापजनक होती. - ताहेरा शेख, महापौर...

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com