सर्वात मोठ्या लसीकरण मोहीमेचा सहभाग आनंददायी - सूरज मांढरे

4suraj_20mandhare_2.jpg
4suraj_20mandhare_2.jpg

नाशिक : जगभर हाहाकार माजविणाऱ्या कोरोनाच्या लसीकरणाची मोहीमेला शनिवारी (ता. 16) सुरुवात झाली आहे. कोविड लढ्यातील हा अत्यंत ऐतिहासिक दिवस आहे. जगातील सर्वात मोठ्या ऐतिहासिक मोहीमेचा सहभाग आनंददायी आहे. असे प्रतिपादन जिल्हाधिकारी सूरज मांढरे यांनी केले.

नाशिक जिल्ह्यात लसीकरणाचा शुभारंभ

जिल्हा सामान्य रुग्णालयात शनिवारी (ता. 15) कोविड 19 लसीकरण मोहिमेचा विभागीय आयुक्त राधाकृष्ण गमे, जिल्हाधिकारी सूरज मांढरे, पोलीस आयुक दिपक पांडे, जि.प. मुख्य कार्यकारी अधिकारी लीना बनसोड, आरोग्य उपसंचालक डॉ. पी.डी.गांडाळ, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. श्रीनिवास, जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. रत्ना रावखंडे, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ.कपिल आहेर, डॉ.सुशील वाघचौरे, निवासी वैद्यकिय अधिकारी डॉ.प्रशांत खैरे, लसीकरण नोडल अधिकारी डॉ.आर.जी.चौधरी, नोडल अधिकारी डॉ. अनंत पवार आदीच्या उपस्थितीत शुभारंभ झाला. 

आरोग्य कर्मचाऱ्यांच्या लसीकरणाला सुरुवात

मांढरे म्हणाले की, जिल्ह्यात 13 लसीकरण केंद्र निश्चित करण्यात आले असून या केंद्रांच्या माध्यमातून निवडलेल्या आरोग्य कर्मचाऱ्यांना लसीकरणाला सुरुवात झाली. जिल्ह्यातील पहिल्या टप्प्यात 19 हजार 500 आरोग्य कर्मचाऱ्यांचे लसीकरण होणार आहे. प्रत्येक केंद्रावर लसीकरणानंतर लाभार्थ्यांला लसीचे काही साईड इफेक्ट जाणवल्यास प्रत्येक केंद्रावर 102 व 108 या अम्बुलन्सची सेवा 24 तासांसाठी उपलब्ध करून दिली आहे. पुढील उपचारासाठी जिल्हास्तरावर अद्ययावत सुविधा असलेल्या रुग्णालयाची निवड केल्याचेही मांढरे यांनी सांगितले. 

मिलींद पवार पहिले

जिल्हा रुग्णालय नाशिक येथे सफाई कर्मचारी कार्यरत असणाऱ्या मिलिंद पवार यांना कोरोनाची पहिली लस देण्यात आली. तसेच जिल्हा बालरोग तज्ज्ञ डॉ. बाबुलाल अग्रवाल (वय 68 वर्ष) यांना दुसरी लस देण्यात आली आहे. जिल्ह्यात उभारलेल्या तेरा केंद्रावर प्रत्येकी शंभर आरोग्यकर्मींना लस देण्याचे दैनंदिन उद्दिष्ट आहे. 

विभागात 60 हजार लसीकरण

लसीकरण मोहिमेचा नाशिक विभागातील नाशिक, नगर, धुळे, जळगांव आणि नंदुरबार जिल्ह्यात आज एकाचवेळी मोहिमेचा शुभारंभ झाला. नाशिक विभागासाठी 1 लाख 32 हजार डोस प्राप्त झाले असून पहिल्या टप्प्यात 60 हजार आरोग्य कर्मचाऱ्यांना लस देण्यात येणार आहे. - राधाकृष्ण गमे (विभागीय आयुक्त नाशिक) 

रुग्णालय उदिष्ट्य लसीकरण

जिल्हा रुग्णालय 100 37
इंदिरा गांधी रुग्णालय 100 27
नवीन बिटको रुग्णालय 100 21
जे.डी.बिटको रुग्णालय 100 44
मालेगाव रुग्णालय 100 42
कळवण रुग्णालय 100 53
निफाड रुग्णालय 100 29
चांदवड रुग्णालय 100 52
येवला रुग्णालय 100 45
युपीएचसी कॅम्प मालेगाव 100 35
युपीएचसी निमा मालेगाव 100 33
युपीएचसी राजारामपुरा 100 23
युपीएचसी सोयगाव 100 22
1300 463 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com