सावधान! सार्वजनिक ठिकाणी हैदोस घालणे पडणार महागात; 'जसा आजार तसे औषध' आयुक्तांचा इशारा

सकाळ वृत्तसेवा
Sunday, 4 October 2020

यासह चेन स्नॅचिंग, अवैध धंदे आदींबाबत तातडीने उपाययोजना करण्याबरोबर यापुढे ‘जसा आजार, तसे औषध असेल, असे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी सांगितले. उपनगर पोलीस ठाण्यात नागरिक संवाद उपक्रमांत श्री. पांडे यांनी पोलिस ठाण्यात जनता दरबार भरविण्याचे जाहीर केले होते.

नाशिक : (नाशिक रोड) रस्त्यावर वाढदिवसाचा केक कापून हैदोस घातल्यास पोलिस थेट लाठीमार करतील. तसेच गुन्हेगारी, उद्यांनांमध्ये मद्याचे सेवन करणे, नशापाणी करणे, सार्वजनिक हैदोस घालणे टवाळखोर तरूणांना चांगलेच महागात पडणार आहे. कारण यापुढे असे प्रकार घडल्यास पोलिस आयुक्तांकडून थेट अशांना लाठीमार करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहे.

गुन्हेगारी मोडून काढण्याचा इरादा

यासह चेन स्नॅचिंग, अवैध धंदे आदींबाबत तातडीने उपाययोजना करण्याबरोबर यापुढे ‘जसा आजार, तसे औषध असेल, असे पोलिस आयुक्त दीपक पांडे यांनी सांगितले. उपनगर पोलीस ठाण्यात नागरिक संवाद उपक्रमांत श्री. पांडे यांनी पोलिस ठाण्यात जनता दरबार भरविण्याचे जाहीर केले होते. लोखंडे मळा, जय भवानी रोड, देवळाली गावात गुन्हेगारी वाढलेल्या उपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीत पोलिस आयुक्तांनी पहिली बैठक घेत, गुन्हेगारी मोडून काढण्याचा इरादा स्पष्ट केला. उपायुक्त विजय खरात, लक्ष्मीकांत पाटील, सहाय्यक पोलीस आयुक्त अशोक नखाते, वरिष्ठ पोलीस निरीक्षक सुनील रोहकले, नगरसेवक दिनकर आढाव, जगदीश पवार, आशा तडवी, प्रशांत दिवे, राहुल दिवे, ज्योती खोले संजय भालेराव, बंटी कोरडे, शिवाजी हांडोरे, महेंद्र अहिरे, बापू सातपुते, नवनाथ ढगे, प्रकाश बागूल, श्‍याम गोहाड, बाळासाहेब शिंदे, प्रमोद पगारे, किशोर कटारे आदी उपस्थित होते.

हेही वाचा > संतापजनक! सोळा वर्षाच्या युवतीसोबत चाळीस वर्षीय नवरदेवाचे लग्न; बालविवाह कायद्यातंर्गत गुन्हा दाखल

आता मिळणार जसा आजार तसे औषध

श्री. पांडे म्हणाले, की शहरात मास्क न घालणे, सोशल डिस्टन्सिंग न पाळणे, दुकानांपुढे गर्दी करणे, रस्त्यावर थुंकणे याबाबत तातडीने कारवाई करणार आहे. तसेच महापालिकेच्या उद्यानात दारूच्या पार्ट्या करणारे आणि गॅंगवार करणाऱ्यांवर कठोर कारवाई केली जाईल. जसा आजार तसे औषध, असे पोलिसांचे धोरण राहणार आहे.

नागरिकांच्या अपेक्षा

उपनगर पोलिस ठाण्यात पोलिसबळ वाढवावे
महापालिका उद्यानातील दारूपार्ट्या थांबवा
देवळालीगावातील गँगवॉर टोळ्यांना आवरा
लोखंडे मळ्यातील गांजा विक्रीला आवर घाला

हेही वाचा > ब्रेकिंग : पाकिस्तानसाठी तोफखान्याची हेरगिरी करणारा नाशिकमधून ताब्यात; सीमेवर तणावपूर्ण वातावरण असताना प्रकरण उजेडात

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: It will be expensive to riot in public places in Nashik city nashik marathi news