
नाशिक : लॉकडाऊनदरम्यान हाताशी काम नसल्यामुळे अनेक कष्टकऱ्यांचे लोंढे मुंबई-आग्रा महामार्ग वाहत होते. त्यांची प्रचंड गर्दी कसारा घाटात पाहायला शनिवारी (ता.9) रोजी बघायला मिळाली. मात्र राज्य सरकार, प्रशासन आणि स्वयंसेवी संस्थांनी कष्टकऱ्यांच्या प्रवासाची व्यवस्था केल्याने आज रविवार (ता.10) कसारा घाट मोकळा झाला आहे.
एसटी महामंडळतर्फे मोफत प्रवासाची व्यवस्था
इगतपुरी तहसीलदारांनी कसारा घाटाची पाहणी केली. त्यावेळी वाहने फारसी महामार्गावर नसल्याचे चित्र पहावयास मिळाले. कसारा चेकपोस्ट इथे 500 थंड पेय बाटल्या ठेवण्यात आल्या आहेत. मात्र कष्टकरी नाहीत. एसटी महामंडळ तर्फे मोफत प्रवासाची व्यवस्था मध्यप्रदेश सीमेपर्यंत करण्यात आली आहे. तसेच महामार्गवरून मुंबईला माल उतरवून निघालेल्या ट्रक, टेम्पो मध्ये स्वयंसेवी संस्थांतर्फे बसवून देण्यात येत होते.
कोरोनाच्या भीतीमुळे अनेक मजूर पायी आपल्या गावाकडे
लॉकडाऊनदरम्यान स्थलांतरित मजुरांना आपापल्या गावात सोडण्यासाठी केंद्र सरकारने परवानगी दिली आहे. स्थलांतरित मजुरांसाठी रेल्वे, ट्रेन, बसेसची सुविधा सरकारकडून केलं जात आहे. राज्य सरकार मजुरांना घरी पाठवण्यासाठी नियोजन करत आहे. भिवंडी, कल्याण, मुंबई येथून परप्रांतियांसाठी विशेष ट्रेनदेखील सोडण्यात आल्या आहेत. मात्र, कोरोनाच्या भीतीमुळे अनेक मजूर विविध भागातून पायी आपल्या गावाकडे निघाले आहेत.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.