esakal | धक्कादायक! राजकीय संबंधाचा घेतला गैरफायदा...महिलेवर केला अत्याचार
sakal

बोलून बातमी शोधा

woman face atrocities.jpg

पतीची बदली करून देण्याचे आमिष दाखवत पैसे उकळण्यासह पोलिसाच्या पत्नीशी बळजबरीने शरीरसंबंध ठेवत त्याचे चित्रीकरण व्हायरल करण्याची धमकी दिल्या प्रकरणी गोरख खर्जुल या शिवसेना कार्यकर्त्याविरोधात बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

धक्कादायक! राजकीय संबंधाचा घेतला गैरफायदा...महिलेवर केला अत्याचार

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : (नाशिक रोड) खुर्जल मळ्यात राहणाऱ्या संशयित व्यक्तीची तिथल्या महिलेशी ओळख झाली होती... राजकीय संबंधांद्वारे पोलिस दलातील पतीची बदली करून देण्याचे आमिष, तसेच पतीला व मुलाला मारण्याची धमकी आणि याचाच गैरफायदा घेत त्याने धक्कादायक प्रकार केल्याची बाब उघडकीस आली आहे.

असा आहे प्रकार

पीडितेच्या तक्रारीनुसार, तिचा पती ग्रामीण पोलिस दलात कार्यरत आहे. खुर्जल मळामधील हरी संस्कृती येथील श्लोका परिसरात राहणाऱ्या संशयित गोरख खुर्जल याची पीडित महिलेशी ओळख झाली. त्यानंतर महिलेच्या घरी येणे-जाणे सुरू केले. याचा गैरफायदा घेऊन त्याने वेळोवेळी महिलेशी जवळीक साधली. पतीची बदली करून देतो, असे सांगून त्याबदल्यात एक लाख 85 हजारांची मागणी केली. जानेवारीतही महिला लहान मुलासह घरी असताना खर्जुलने मुलाला ठार मारण्याची धमकी देत बळजबरीने तिच्याशी शरीरसंबंध केले. यावेळी त्याने या महिलेचे फोटो व व्हिडीओ स्वत:च्या मोबाइलमध्ये काढले. यानंतर मे महिन्यात त्याने या महिलेच्या मोबाइलवर अश्लील फोटो पाठवला. या प्रकाराबाबत पतीला माहिती देऊन बदनामी करू असे म्हणत तो तिच्या घरी गेला. यावेळी महिलेने प्रतिकार केल्याने खर्जुल याने पिस्तुलाचा धाक दाखवून मुलाला ठार मारण्याची धमकी देत तिच्यावर बलात्कार केला. मोबाइलमधील अश्लील फोटो व व्हिडीओ व्हायरल करून बदनामी करण्याची धमकी देत त्याने वारंवार शरीरसंबंधांची मागणी केल्याने पीडित महिलेने हा प्रकार पतीला सांगितला. 

हेही वाचा > राजेंद्र सरदार खून प्रकरण..अखेर गुढ उलघडले ! प्रियकराच्या मदतीने काढला कायमचा काटा

या प्रकारामुळे घाबरलेल्या महिलेने नाशिकरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिल्यावर शुक्रवारी (दि. १५) रात्री बारा वाजेच्या दरम्यान गोरख खर्जुल याच्या विरोधात भारतीय शस्रास्त्र कायदा, भारतीय आयटी कायदा आणि बलात्काराचा गुन्हा दाखल झाला. यानंतर संशयित गोरख खर्जुल फरार झाला. सहाय्यक पोलिस निरीक्षक सुधीर डोंबरे तपास करीत आहेत.

हेही वाचा > ह्रदय पिळवटून टाकणारी घटना..अखेर सुटलाच 'त्या' मजुरांचा धीर.. रोजच्या मरणातून सोडवला जीव एकदाचा

go to top