"जागा तुझ्या बापाची आहे का?".. जागा तर माझीच...अन् बघता - बघता त्याने | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

knife attack.jpg

पोलिसांनी शालिमार येथील रस्त्यावरील व्यावसायिकांना दिलेला भुयारी मार्गाचा पर्याय फसला असून, जागावाटपानंतर जागेच्या मालकीवरून लगेच दोघांमध्ये वाद होऊन एकावर चाकू हल्ला झाला. त्यानंतर पोलिसांकडून मार्गास पुन्हा कुलूप लावण्यात आले.

"जागा तुझ्या बापाची आहे का?".. जागा तर माझीच...अन् बघता - बघता त्याने

नाशिक : शालिमार येथील वाहतूक कोंडी सुटावी, यासाठी पोलिस आणि महापालिके तर्फे शुक्रवारी (ता. 31) शालिमार ते रविवार कारंजा परिसरात संयुक्त अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली. पोलिसांनी शालिमार येथील रस्त्यावरील व्यावसायिकांना दिलेला भुयारी मार्गाचा पर्याय फसला असून, जागावाटपानंतर जागेच्या मालकीवरून लगेच दोघांमध्ये वाद होऊन एकावर चाकूहल्ला झाला.

असा घडला प्रकार...

शालिमार येथील वाहतूक कोंडी सुटावी, यासाठी पोलिस आणि महापालिकेतर्फे शुक्रवारी (ता. 31)शालिमार ते रविवार कारंजा परिसरात संयुक्त अतिक्रमण मोहीम राबविण्यात आली. पोलिस आयुक्त विश्‍वास नांगरे-पाटील यांनी स्वतः उपस्थित राहून शालिमार येथील व्यावसायिकांशी चर्चा केली. त्यांना व्दारका चौकातील भुयारी मार्गाचा पर्याय सुचविला. त्यानंतर, कोणतेही नियोजन न करता दुपारनंतर व्यावसायिकांना भुयारी मार्गात पोलिसांकडून जागावाटपाचे काम सुरू झाले. व्यावसायिकांनी त्यांच्या जागेवर स्वतःचे नाव लिहिले, तर काही जागेवर बसून राहिले. चारच्या सुमारास व्दारका परिसरातील विविध भागांतील नागरिकांनी अचानक भुयारी मार्गात येऊन स्थानिक बेरोजगार नागरिक असताना दुसऱ्या व्यावसायिकांना येथे कसे स्थान दिले जात आहे, असे म्हणत भिंतीवर लिहिलेले व्यावसायिकांचे नाव पुसून स्वतःचे नाव टाकण्याचा प्रयत्न केला. त्यातून दोघांमध्ये वाद झाला. बघता-बघता एकाने दुसऱ्यावर चाकूने वार करत जखमी केले. वार करणारा पळून गेला.

हेही वाचा > 'जो आपल्याशी नडला त्याला आपण फोडला!'...'इथं' गुंडच देताय पोलिसांना आव्हान 

प्रवेशद्वारास कुलूप...

सायंकाळी संशयित आणि जखमी दोघांमध्ये समझोता झाल्याने पोलिसांत नोंद करण्यात आली नाही. वाद वाढून अन्य मोठी घटना घडू नये, याची काळजी घेत पोलिसानी सर्वांना बाहेर काढून मार्ग बंद करून घेत प्रवेशद्वारास कुलूप लावले. 

हेही वाचा > दहा दिवसांपासून बेपत्ता होतो 'ते'...अन् भेटले तर अशा अवस्थेत..


 

टॅग्स :Nashik