'हॉस्पिटल नव्हे हे तर शोभेचे बाहुले!'...'इथं' औषधांअभावी होतेय रुग्णांची आबाळ

nampur hospital.jpg
nampur hospital.jpg

नाशिक : (नामपूर) कोट्यवधी रुपये खर्च करून बांधलेल्या येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकाऱ्यांसह कर्मचाऱ्यांना मास्क, पीपीटी किट, सॅनिटायइर अशा कोरोनाशी लढणाऱ्या सुविधा नसल्याने आरोग्यसेवा रामभरोसे आहे. पुरेसा औषधसाठा नसल्याने मोसम खोऱ्यातील रुग्णांची आबाळ होत आहे. यामुळे तातडीने सुविधा द्याव्यात, अशी मागणी मोसम प्रतिष्ठानच्या पदाधिकाऱ्यांनी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. सुरेश जगदाळे यांच्याकडे केली. 

वास्तू शोभेचे बाहुले बनले...

येथील ग्रामीण रुग्णालयात कर्मचाऱ्यांची सेवा चांगली असली, तरी त्यांच्या आरोग्याबाबत आरोग्य विभागाला काहीही सोयरसूतक नाही. दर महिन्याला तीन ते चार हजार रुग्णांची तपासणी होते. त्यामुळे येथील वास्तू शोभेचे बाहुले बनले आहे. येथील रुग्णालयात चार वैद्यकीय अधिकाऱ्यांसह 25 पदे मंजूर असून, अनेक रिक्त पदांमुळे कर्मचाऱ्यांवर अतिरिक्त ताण पडत आहे. अनेक वर्षांपासून वैद्यकीय अधीक्षक वर्ग एक पद रिक्त आहे. औषधनिर्मात्याची शस्त्रक्रिया झाल्याने अन्य कर्मचाऱ्यांना त्यांचे अतिरिक्त काम पाहावे लागत आहे. आरोग्य विभागाकडे वारंवार मागणी करूनही अधिकारी व कर्मचारी मिळत नसल्याने ग्रामस्थांमध्ये संताप व्यक्त होत आहे. 

पदे त्वरित भरण्याची मागणी...
 
कर्मचारी मिळत नसल्याने रुग्ण कल्याण समितीचे पदाधिकारी प्रा. गुलाबराव कापडणीस यांनी पदाचा राजीनामा दिला आहे. येथील ग्रामीण रुग्णालयात वैद्यकीय अधिकारी, सहाय्यक अधीक्षक, वरिष्ठ लिपिक, शिपाई, सफाईदार, डोळे तपासणीस अशी पदे रिक्त आहेत. ही पदे त्वरित भरावीत, अशी मागणी मोसम प्रतिष्ठानचे गणेश खरोटे, राजू पंचाळ, नारायण सावंत, माजी सरपंच कविता सावंत, कमलाकर सोनवणे, सुरेश कंकरेज, तारीक शेख, उमेश दहीदे, किशोर खैरनार आदींनी केली आहे.  

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com