
नाशिक : (लखमापूर) दुपारच्या वेळी शेतात काम करणाऱ्या शेतकऱ्यावर अचानक त्याने हल्ला केले. वयोवृद्ध शेतकऱ्याने प्रतिकार करण्याचा खूप प्रयत्न केला, अखेर त्याने त्या शेतकऱ्याला जखमी केले. शेतकऱ्याने जीवाच्या आकांताने मदतीला हाका मारल्या अन् शेवटी ते धावतच आले...ही घटना घडली दिंडोरी तालुक्यातील बाडगीचा पाडा येथे...सविस्तर प्रकार असा की...
अशी आहे घटना
तालुक्यातील बाडगीचा पाडा येथील शेतकरी सीताराम अमृता कनोजे (वय 65) हे रविवारी (ता. 10) बाडगीचा पाडा शिवारातील आपल्या शेतात काम करत असताना दुपारी एकच्या दरम्यान अचानक बिबट्याने त्यांच्यावर हल्ला चढवला; पण या वयोवृद्ध शेतकऱ्याने प्रतिकार केला. या दरम्यान बिबट्याच्या हल्ल्यात कनोजे यांच्या कपाळावर डाव्या भुवईवर गंभीर दुखापत झाली आहे. कनोजे यांनी आरडाओरड करीत परिसरात काम करणाऱ्या इतर शेतकऱ्यांना मदतीसाठी हाका मारल्या. त्यावेळी आरोळ्या ऐकून परिसरातील इतर शेतकऱ्यांनी कनोजे यांच्या शेताकडे धाव घेत बिबट्याला पिटाळून लावले. तसेच तातडीने कनोजे यांना ननाशी प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल केले. तेथील वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्यांच्यावर उपचार करत कनोजे यांच्या डाव्या भुवईवर सहा टाके टाकले.
बिबट्याचे माहेरघर असलेल्या ननाशी परिसरात गेल्या चार ते पाच वर्षांपासून बिबट्याचा उपद्रव नव्हता; परंतु आता पुन्हा बिबट्याचा वावर वाढला असून, परिसरात अनेक शेतकरी मळ्यात वस्ती करून राहतात आणि दिवसाढवळ्या बिबट्याचा हल्ला झाल्याने शेतकरीवर्गात घबराट निर्माण झाली आहे. वन विभागाने पिंजरा लावून बिबट्याचा बंदोबस्त करावा, अशी मागणी परिसरातील शेतकरी आणि ग्रामस्थांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.