
नाशिक : महापालिकेमार्फत टीडीआरच्या मोबदल्यात आतापर्यंत भूसंपादनाची जेवढी प्रकरणे मार्गी लागली त्या सर्वांची चौकशी करण्याच्या सूचना महापौर सतीश कुलकर्णी यांनी दिल्या असून, त्यासाठी अधीक्षक अभियंत्यांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्याचा निर्णय दिला आहे.
देवळाली शिवारातील सर्व्हे क्रमांक २९५ मधील टीडीआर घोटाळ्याचादेखील यात समावेश आहे. भाजप गटनेते जगदीश पाटील यांनी या प्रकरणाला वाचा फोडली. १९९३ च्या मंजूर विकास आराखड्यात सर्व्हे क्रमांक १५९ (भागशः)मधील जागा क्रीडांगणासाठी आरक्षित होती. टीडीआर वाटाघाटी पद्धतीने विकासकाने महापालिकेला जागा देणे अपेक्षित होते. २९ ऑगस्ट २००१ ला भूसंपादनाच्या मोबदल्यात ७५ टक्के टीडीआर देण्यात आला; परंतु जागा हस्तांतरित करताना जागामालकाने बांधकाम हटविले नाही. महापालिकेनेदेखील स्थळ पाहणी न करताच टीडीआर वाटले. मालकी हक्कासाठी महापालिकेने करारनामा करून सातबारा उताऱ्यावर नोंदणी करणे अपेक्षित होते. परंतु तसे न झाल्याने महापालिकेची फसवणूक झाली. सद्यःस्थितीत जागेवर पक्क्या स्वरूपाचे बांधकाम व पत्र्याची शेड आहे. महापालिकेने भूखंडावरील अतिक्रमण हटविणे गरजेचे असताना प्रशासनाकडून अतिक्रमणधारकांना मदत केली जाते, तसेच मूळ कागदपत्रे गहाळ झाल्याचा आरोप पाटील यांनी केला.
भूसंपानात मोठे रॅकेट
टीडीआरच्या मोबदल्यात भूसंपादन करून देणारे शहरात मोठे रॅकेट असून, त्याला प्रशासनातील अधिकाऱ्यांची साथ आहे. टीडीआर पदरात पाडून घेण्यासाठी ठराविक अधिकाऱ्याला भेटण्याचे सल्ले दिले जातात. त्या व्यक्तीला भेटले तरच प्रकरणे मंजूर होतात अन्यथा दखल घेतली जात नसल्याचा आरोप शिंदे यांनी केला. पाटील व शिंदे यांच्या आरोपावरून महापौर कुलकर्णी यांनी पंचवटी टीडीआर घोटाळ्याची चौकशी करण्याचे सर्वाधिकार आयुक्त कैलास जाधव यांना देत टीडीआरद्वारे भूसंपादन झालेल्या सर्व प्रकरणांची चौकशी करण्यासाठी अधीक्षक अभियंता संदीप नलावडे यांच्या अध्यक्षतेखाली समितीत नगररचना सहाय्यक संचालक अंकुश सोनकांबळे, मुख्य लेखापरीक्षक बी. जी. सोनकांबळे, सभागृहनेता सतीश सोनवणे, भाजप गटनेता जगदीश पाटील, शिवसेना गटनेता विलास शिंदे यांचा समावेश केला.
सर्वेअर जाधव अडचणीत
महापालिकेच्या जागांची मोजणी करण्यापासून ते पीटी शीट तयार करण्यापर्यंतची कामे करण्यासाठी महापालिकेने सर्वेअर म्हणून एच. टी. जाधव यांची नियुक्ती केली आहे; परंतु जाधव जमीनमालकांशी संगनमत करून महापालिकेचे नुकसान करत असल्याचा आरोप जगदीश पाटील यांनी केला.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.