esakal | मामा होता म्हणून भाची सहीसलामत! अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले भाचीला
sakal

बोलून बातमी शोधा

leopard 5.jpg

होता मामा म्हणून भाची सहीसलामत राहिली..! मामाने आपल्या भाचीला अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले. मामाने दाखविलेल्या बहादूरी बद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच या घटनेची सर्वत्र चर्चा होत होत असून आश्चर्यही व्यक्त होत आहे.

मामा होता म्हणून भाची सहीसलामत! अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले भाचीला

sakal_logo
By
काळू राजोळे

वाडीवऱ्हे (नाशिक) : होता मामा म्हणून भाची सहीसलामत राहिली..! मामाने आपल्या भाचीला अक्षरश: मृत्यूच्या दाढेतून खेचून आणले. मामाने दाखविलेल्या बहादूरी बद्दल त्याचे सर्वत्र कौतुक होत आहे. तसेच या घटनेची सर्वत्र चर्चा होत होत असून आश्चर्यही व्यक्त होत आहे.

तो फरपटत भाचीला घेऊन जात होता...

खेड परदेशवाडी येथे रात्रीच्या वेळी घरात घुसून जया धोंडिराम चवर (वय ३) या मुलीवर बिबट्याने हल्ला करून गंभीर जखमी केले. बिबट्या मुलीला फरपटत नेत असताना तिच्या मामाने बिबट्यावर हल्ला करून चिमुरडीला बिबट्याच्या तावडीतून सोडविले. चिमुरड्या जयाला उपचारासाठी नाशिकला जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले. श्रमजीवी संघटनेने या भागात तत्काळ पिंजरा लावण्याची मागणी केली असता बुधवारी सायंकाळी उशिरा लावण्याचे आश्‍वासन वन विभागाच्या सूत्रांनी दिल्याचे श्रमजीवी संघटनेचे भगवान मधे यांनी सांगितले. दरम्यान, मुलीची प्रकृती सुधारत असल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.  

हेही वाचा > जिल्हाधिकारी चक्क कार्यालय सोडून 'जोडप्याला' भेटतात तेव्हा..!...

मामाने प्रसंगावधान दाखविले

भैरोबाचे खेडजवळील परदेशवाडी (ता. इगतपुरी) येथे तीन वर्षांच्या चिमुरडीवर बिबट्याने हल्ला करून २०० मीटर फरपटत नेले. मुलीच्या मामाने प्रसंगावधान दाखवीत बिबट्यावर हल्ला करून मुलीला सोडविले.

हेही वाचा > नाशिकच्या गुलाबी थंडीत हॅलिकॉप्टरने अचानक आमीर खानची एंट्री होते तेव्हा..!..

go to top