VIDEO : शिकारीच्या नादात स्वत:चाच जीव खड्ड्यात..थराराक!

well.jpg
well.jpg

नाशिक/अंबासन : महड (ता. बागलाण) शिवारात बिबट्या धूम ठोकताना विहिरीत पडला. वन विभागाच्या कर्मचाऱ्यांनी बिबट्याला वाचविण्यासाठी प्रयत्न केले. मात्र, अपयश आले. विहिरीत बुडून बिबट्याचा मृत्यू झाला. 

असा घडला प्रकार

गुरुवारी (ता. 20) रात्री नऊच्या सुमारास महड शिवारातील शेतकरी हेमराज आहिरे यांच्या पारडीवर बिबट्याने हल्ला चढविला. इतर जनावरांनी हंबरडा फोडला. यामुळे घरातील सदस्य बाहेर आले. त्यांना पारडीवर बिबट्याने हल्ला चढविल्याचे निदर्शनास आले. कुटुंबीयांनी आरडाओरडा केला असता, बिबट्याने धूम ठोकली. बिबट्या पळत असताना देवीदास आहिरे यांच्या विहिरीत पडला. याबाबत हेमराज आहिरे यांनी वन विभागाला माहिती दिली. रात्रीच वन विभागाचे कर्मचारी दाखल झाले. 

दरम्यान, गस्तीवर असलेले पोलिसही या ठिकाणी हजर झाले. कर्मचारी बिबट्याला बाहेर काढण्यासाठी आटोकाट प्रयत्न करीत होते. मात्र, बिबट्या विहिरीत बुडाला. विहीर खडकावर असल्याने बिबट्याला दगडाचा मार लागला असावा, असा अंदाज वन कर्मचाऱ्यांनी लावला. दरम्यान, बिबट्या जीव वाचविण्यासाठी पाइपाला पकडत असताना, पाइपालाही होल पडल्याचे निदर्शनास आले. पुन्हा सकाळी पट्टीच्या पोहणाऱ्यांना पाचारण करण्यात आले. विहिरीत पाणी जास्त असल्याने मेहनत वाया गेली. दोन वीजपंप जोडून पाणी उपसा करण्याचा प्रयत्न केला, तरीही प्रयत्न तोकडे पडत होते. शुक्रवारी (ता. 21) सायंकाळपर्यंत प्रयत्न सुरू होते. मात्र, बिबट्याला बाहेर काढण्यासाठी असफल ठरले. रात्र झाल्यामुळे शनिवारी (ता. 22) पुन्हा वीजपंप जोडून विहिरीतील पाणी उपसा करून मृत बिबट्याला बाहेर काढले जाणार असल्याची माहिती वनकर्मचाऱ्यांनी दिली. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com