थरारक! जेव्हा मायलेकाच्या वाटेत झाली बिबट्याची एंट्री; परिसरात भीतीचे वातावरण

अंबादास शिंदे
Sunday, 4 October 2020

वन विभागाने या घटनेची दखल घेत ठिकठिकाणी पिंजरे लावून बारा बिबट्यांना जेरबंद केले. मात्र पुन्हा एकदा बिबट्यांनी संचार वाढविला आहे. नाशिक रोड पूर्व भागात याची सुरवात झाली असून, शुक्रवारी (ता. २) सकाळी नऊच्या सुमारास पळसे शिवारात बिबट्याचे दर्शन झाले.

नाशिक : (नाशिक रोड) नाशिक-पुणे महामार्गावरील शिंदे (नाशिक) गावाजवळील राजयोग मंगल कार्यालयासमोर बिबट्याच्या धडकेने जेल रोडचे मायलेक जखमी झाले. संबंधीत घटनेने परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

अशी आहे घटना

काही महिन्यांपूर्वी हिंगणवेढे, कोटमगाव, दोनवाडी, बाबळेश्वर येथे बिबट्याने लहान मुलांवर हल्ले करण्याचा घटना घडल्या. वन विभागाने या घटनेची दखल घेत ठिकठिकाणी पिंजरे लावून बारा बिबट्यांना जेरबंद केले. मात्र पुन्हा एकदा बिबट्यांनी संचार वाढविला आहे. नाशिक रोड पूर्व भागात याची सुरवात झाली असून, शुक्रवारी (ता. २) सकाळी नऊच्या सुमारास पळसे शिवारात बिबट्याचे दर्शन झाले. रात्री बिबट्याने सिन्नरवरून नाशिक रोडकडे जाणाऱ्या मायलेकाच्या गाडीला जबर धडक दिल्याने मायलेक खाली कोसळले. ते जखमी झाल्याने त्यांना उपचारार्थ नाशिक रोड येथील जयराम हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. किरकोळ जखमी झाल्याने त्यांना प्राथमिक उपचार करून सोडून देण्यात आले.

हेही वाचा > ब्रेकिंग : पाकिस्तानसाठी तोफखान्याची हेरगिरी करणारा नाशिकमधून ताब्यात; सीमेवर तणावपूर्ण वातावरण असताना प्रकरण उजेडात

हेही वाचा > संतापजनक! सोळा वर्षाच्या युवतीसोबत चाळीस वर्षीय नवरदेवाचे लग्न; बालविवाह कायद्यातंर्गत गुन्हा दाखल

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Leopard hits vehicle, mother and son injured nashik marathi news