दोन वर्षांच्या तुलनेत यंदा दिवाळीत ध्वनिप्रदूषण कमी; प्रदूषण नियंत्रण मंडळाचा दावा

सतिश निकुंभ
Wednesday, 18 November 2020

या वर्षी नागरिकांमध्ये जागृती झाली. त्यामुळे मुलांनीही पालकांकडे फटाक्‍यांची मागणी केली नाही. तसेच हवाप्रदूषण करणाऱ्या फटाक्‍यांवरही मंडळाने दिवाळीपूर्वीच चाचणी घेऊन संबंधिताना सूचना दिल्यामुळे घातक फटाक्‍यांना बाजारात बंदी होती.

सातपूर (नाशिक) : दिवाळीपूर्वी नाशिककरांना कमीत कमी फटाके फोडण्याचे आव्हान केले होते. तर यावर्षी नाशिककरांनी स्वतःहून प्रदुषण कमी करण्याबाबत पाऊले उचलल्यामुळे गेल्या वर्षीच्या 55.1 या तुलनेत या वर्षी 52 डेसिबल एवढे ध्वनिप्रदूषण झाल्याचा दावा मंडळाचे उपप्रादेशिक अधिकारी उपेंद्र कुलकर्णी यांनी केला.

नाशिककरांनी करुन दाखवलं...

दिवाळीत आतषबाजीमुळे ध्वनी व वायुप्रदूषण मोठ्या प्रमाणावर होते. त्या पार्श्‍वभूमीवर मंडळाने केलेल्या चाचणीतून दोन वर्षांचा अहवाल पाहता यावर्षी हवेचे व ध्वनिप्रदूषण कमी झाल्याचा दावा नाशिक प्रदूषण नियंत्रण मंडळाने केला. हवा प्रदूषणासाठी उद्योग भवन, राजीव गांधी भवन, केटीएचएम महाविद्यालय, व्हीआयपी कंपनी, आरटीओ आदी ठिकाणी चाचणी घेतली. या वर्षी नागरिकांमध्ये जागृती झाली. त्यामुळे मुलांनीही पालकांकडे फटाक्‍यांची मागणी केली नाही. तसेच हवाप्रदूषण करणाऱ्या फटाक्‍यांवरही मंडळाने दिवाळीपूर्वीच चाचणी घेऊन संबंधिताना सूचना दिल्यामुळे घातक फटाक्‍यांना बाजारात बंदी होती.

दिवाळीच्या 14 ते 17 नोव्हेंबर दरम्यान सन 2020 मध्ये सर्वात जास्त पंचवटी 66 ते सर्वात कमी हे दहीपुल येथील 52 एवढा आहे. यंदा मोठ्या प्रमाणावर मंडळातर्फे जनजागृतीचे प्रयत्न केले. तरी नाशिककरांनी स्वत:हून फटाक्याचे प्रदुषण रोखण्यासाठी केलेल्या प्रयत्नामुळे महाराष्ट्रातील सर्वात कमी प्रदूषाणाची नोंद झाली आहे. - उपेंद्र कुलकर्णी, उपप्रादेशिक आधिकारी


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Less noise pollution this Diwali than in two years nashik marathi news