"आई गं..तुझी आठवण येतेय.."भेदरलेल्या अवस्थेत चिमुरडा एकटाच रस्त्यावर; सोशल मिडियामुळे झाला चमत्कार

प्रमोद दंडगव्हाळ
Wednesday, 16 September 2020

सोशल मीडियाचा वापर जितका चांगला तितका वाईट असल्याचे बोलले जात असते. परंतु सोशल मीडियामुळे गैरप्रकार होत असताना नाशिकच्या अंबडमध्ये एक अशी घटना घडली आहे. ज्याने आपण सोशल मिडियाला नक्कीच पॉझिटिव्हही म्हणू शकतो. 

नाशिक / सिडको : सोशल मीडियाचा वापर जितका चांगला तितका वाईट असल्याचे बोलले जात असते. परंतु सोशल मीडियामुळे गैरप्रकार होत असताना नाशिकच्या अंबडमध्ये एक अशी घटना घडली आहे. ज्याने आपण सोशल मिडियाला नक्कीच पॉझिटिव्हही म्हणू शकतो. 

काय घडले?

अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरेश पवळे (वय ७) बालक बेदरलेल्या अवस्थेत होता. त्यावेळी पोलीसांना रडणाऱ्या त्या बालकाची कीव आली. त्यांनी त्याला जवळ घेत विचारपूस केली. परंतु त्याला काही समजत नसल्याने बोलत नव्हता. त्यानंतर पोलिसांनी मुलाला पोलिस ठाण्यात आणून सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांना माहिती दिली.

आम्हाला देवासारखे भेटले​

त्यानंतर पोलिसांनी अनेक ठिकाणी चौकशी केली. परंतु या बालकाबाबत काहीही माहिती मिळत नसल्याने बालकाचे फोटो काढून सोशल मीडियावर व्हायरल करून परिसरातील सर्व नागरिकांना पुढे पाठविण्याचे आवाहन केले. त्यांनतर फोटो सर्वत्र व्हायरल झाल्यानंतर पोलिसांना फोन आला. हा मुलगा आमचा असल्याचे सांगितले. मुलाची आई - वडील पोलीस स्टेशन येथे आले. सुरेशच्या आईने त्याला पाहताच जीव भांड्यात पडला. अंबड पोलीस व इतरांनी केलेल्या कार्याचे पालकांनी आभार मानले. यावेळी मुलाला त्याच्या पालकांच्या ताब्यात देण्यात आले. सुरेशला शोधून देणाऱ्या सर्व व्यक्‍ती आम्हाला देवासारखे भेटले, असे सुरेशच्या आईने सांगितले.

मुलाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल

अंबड पोलिस ठाण्याच्या हद्दीत सुरेश पवळे (वय ७) गस्तीवर असलेल्या पोलिसांना फिरताना दिसला. पोलिसांनी त्याची विचारपूस केली असता, मुलगा हरवल्याचे त्यांच्या लक्षात आले. पोलिसांनी मुलाला पोलिस ठाण्यात आणून सहाय्यक पोलिस निरीक्षक श्रीकांत निंबाळकर यांना माहिती दिली. श्री. निंबाळकर यांनी वरिष्ठ पोलिस निरीक्षक कुमार चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली मुलाचा फोटो सोशल मीडियावर व्हायरल केला. अवघ्या तासाभरात हरवलेल्या मुलाच्या आई-वडिलांचा शोध लागला. पोलिसांनी मुलाला त्यांच्या स्वाधीन केले.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: lost boy in a few hours Discovered by social media nashik marathi news