esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

Arrested criminal for cheat.jpg

शीतल चव्हाण यांना माहिती मिळताच बहिणींकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले. त्यानंतर सौ. चव्हाण यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागविली असता सर्व बाबी उघड झाल्या.

सख्ख्या बहिंणींनीच केली 'गद्दारी', नात्यावरचा उडला विश्वास...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : (जुने नाशिक) बनावट दस्तावेज तयार करून वडिलोपार्जित शेतजमिनीच्या सातबाऱ्यात फेरफार करत फसवणूक केल्याचा प्रकार बुधवारी (ता. 29) उघड झाला. दोन सख्ख्या बहिणींसह चुलत भाऊ आणि तलाठ्याविरुद्ध भद्रकाली पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. 

असा आहे प्रकार

बुधवार पेठ येथील शीतल चव्हाण (वय 37) यांची मौजे लळिंग (ता. जि. धुळे) येथे वडिलोपार्जित शेतजमीन आहे. वडील, आई आणि सख्ख्या भावाच्या मृत्यूनंतर वारसदार म्हणून स्वतःसह सख्ख्या बहिणी मंगला शिंदे (रा. म्हसरूळ) आणि अंजना पाटील (रा. मखमलाबाद) आहेत. दोघींनी चुलत भाऊ राजेश आहिरे यांच्या मदतीने जमीन मंगला शिंदे यांच्या नावावर होण्यास सौ. चव्हाण यांची हरकत नसल्याचे खोटे कागदपत्र बनविले. त्यावर त्यांच्या परवानगीशिवाय त्यांचे छायाचित्र लावून खोटी सही, अंगठा करून घेतला. सीबीएस येथील मेघदूत शॉपिंग सेंटर येथे त्याबाबतची नोटरी करण्यात आली. त्यानंतर मंगला शिंदे यांनी मौजे लळिंग येथील तत्कालीन तलाठी जी. डी. गिते यांच्या मदतीने शेतजमिनीच्या सातबारा उताऱ्यावर त्यांचे नाव लावून घेतल्याचे तक्रारीत नमूद करण्यात आले. शिवाय त्या जमीन विकसित करण्यासाठी बॅंकेतर्फे जमिनीवर परस्पर 41 लाखांचे कर्ज काढून घेऊन फसवणूक केल्याचेही नमूद केले. 

हेही वाचा > "हा 'उपसरपंच' आज असा नटलाय..की त्याच्या लग्नात सुध्दा तो नटला नव्हता" - अजित पवार

माहितीच्या अधिकारात माहिती मागविली असता सर्व बाबी उघड 

शीतल चव्हाण यांना माहिती मिळताच बहिणींकडे चौकशी केली असता त्यांनी उडवाउडवीचे उत्तर दिले. त्यानंतर सौ. चव्हाण यांनी माहितीच्या अधिकारात माहिती मागविली असता सर्व बाबी उघड झाल्या. बुधवारी (ता. 29) सायंकाळी सौ. चव्हाण यांच्या तक्रारीवरून मंगला शिदे, अंजना पाटील, चुलत भाऊ राजेश आहिरे आणि तलाठी जी. डी. गिते यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला.  

हेही वाचा > अजित पवार म्हणतात..."60 ते 70 हजार जागांची भरती करणार" पण कुठे ते वाचा?

go to top