"हा 'उपसरपंच' आज असा नटलाय..की त्याच्या लग्नात सुध्दा तो नटला नव्हता" - अजित पवार

सकाळ वृत्तसेवा 
Friday, 31 January 2020

हे आघाडीचं सरकार आहे, मात्र  ग्रामविकास, जलसंपदा, वित्त नियोजन, अन्न नागरी पुरवठा खातं पवारसाहेबांनी राष्ट्रवादीकडे घेतले. अरे काय पाहिजे सांग, मी द्यायला बसलोय सांग, असं अजित पवार म्हणाले.

नाशिक : “राजेंद्र (उपसरपंच) आज असा नटलाय की त्याच्या लग्नात देखील तो नटला नव्हता. आम्ही साधेच आहोत” असं अजित पवार म्हणताच, उपस्थित हसून हसून लोटपोट झाले. नाशिक जिल्ह्यातील दिंडोरी तालुक्यातील लखमापूर येथील कादवा इंग्लिश स्कुल आणि कनिष्ठ महाविद्यालय या शाळेचं उद्घाटन राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले. त्यावेळी ते बोलत होते. त्यानंतर त्यांनी वरखेडा ग्रामपंचायतीच्या नूतन इमारतीच्या भूमिपूजनाला हजेरी लावली.

दौऱ्याला पहाटे ६ वाजताच सुरवात...सर्वांनाच आश्चर्याचा धक्का
अजित पवार यांच्या नाशिक जिल्हा दौऱ्याला आज (ता.३१) पहाटे ६ वाजताच सुरवात झाली आहे. अजित पवार यांनी पुन्हा एकदा वेळेच्या आत कार्यक्रमला हजेरी लावल्याने प्रशासनाबरोबरच आयोजकांचीही धावपळ उडाली. ७ वाजेच्या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे ९ वाजता येतील असा अंदाज असताना अजित पवार मात्र वेळेत आल्याने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का बसला. माझ्या मुळे सुर्यमुखी नाराज झाले असं म्हणत त्यांनी कार्यक्रमासाठी लवकर यावं लागल्यामुळे लोकांची माफीही मागितली. 

हेही वाचा > 'ज्यांना' संकटग्रस्त अबला 'तो' समजत होता...त्या तर चक्क...विश्वास नांगरे पाटलांचा फंडा यशस्वी! 

ग्रामपंचायतीला लिफ्ट इथेच पाहिली

बारामती चांगली करण्याचा प्रयत्न करतोय. पण ग्राम पंचायतीच्या कार्यालयाला लिफ्ट मी इथे पाहिली, असं यावेळी अजित पवार म्हणाले, 'एखाद्या ग्रामपंचायत कार्यालयाला लिफ्ट असते हे मी इथेच पाहिलं' या कार्यक्रमाला सरपंच, उपसरपंचांसह गावकरी उपस्थित होते. अजित पवारांनी उपसरपंचांच्या पेहरावावरुनही टोलेबाजी केली. राजेंद्र (उपसरपंच) आज असा नटलाय की लग्नात सुद्धा इकता नटला नसेल,

हेही वाचा >  PHOTO : ह्रदयद्रावक! "आई मला भुक लागलीय" अडीज महिन्याचा तान्हुला शोधतोय आईला.. कारण...


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Ajit Pawar at Varkheda gram panchayat bhumi poojan Nashik Marathi political News