
नाशिक : (मालेगाव) शहरातील कोरोना बाधितांनी सव्वातीनशेचा टप्पा गाठला आहे. पश्चिम भागात कोरोनाचा शिरकाव सुरूच आहे. शहरात रविवारी (ता.3) सकाळी आलेल्या अहवालात 27 पॉझिटिव्ह आले. यात तीन डॉक्टरांचा समावेश आहे. उपचार सुरू असलेल्या यापूर्वीच्या 10 रूग्णांचे अहवालही पॉझिटिव्ह आले आहे.
मालेगावची स्थिती दिवसेंदिवस गंभीर
आज रविवार (ता.3) आलेल्या अहवालातही पोलिस दलातील तीन जवानांचा, तर राज्य राखीव दलाच्या एकाचा समावेश आहे. संगमेश्वर भागातील पीठगिरणी चालकाला कोरोनाची बाधा झाली आहे. कालपर्यत ही गिरणी सुरू होती. यामुळे किती जण संक्रमित झाले असतील याबद्दल मोठी चिंता आहे. राज्यातील हॉटस्पॉट झालेल्या मालेगावची स्थिती दिवसेंदिवस गंभीर होत आहे. आतापर्यंत 15 जणांचा म्रुत्यु झाला आहे. शहरात कोरोना रुग्णांची संख्या थांबायचं नावच घेत नसल्याने मालेगावकरांची चिंता वाढतच आहे. गेल्या दोन दिवसात मालेगावात 68 रुग्ण आढळून आले आहेत.
एक मेस 16
2 मेस 24 व 3 मेस 27 असे तीनच दिवसात 67 कोरोना पॉझिटिव्ह मिळून आले. सध्या रोज वीसच्या संख्येने रूग्ण वाढत आहे. दाभाडीतील बाधित रूग्णही डॉक्टर आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.