मालेगावातील चार सराईत गुन्हेगार तीन जिल्ह्यातून हद्दपार

प्रमोद सावंत
Thursday, 15 October 2020

हद्दपार आदेशाची अंमलबजावणी संबंधितांना तात्काळ करायची आहे. पोलिस व प्रशासनाने गुन्हेगारांविरुध्द हद्दपारीचा बडगा उगारल्यामुळे इतर गुन्हेगारांना वचक बसू शकेल. 

नाशिक/मालेगाव : शहरातील तीन व तालुक्यातील एक अशा चौघा गुन्हेगारांना प्रांताधिकारी विजयानंद शर्मा यांनी नाशिक, धुळे व जळगाव जिल्ह्यातून हद्दपार केले आहे. अफजल खान इकबाल खान उर्फ अफजल आतडी तसेच रवींद्र बुधा कुवर (रा. चिखलओहोळ, ता. मालेगाव) या दोघांना एक वर्षासाठी तर शहेबाज अहमद मोहंमद युसूफ उर्फ कमांडो (रा. गोल्डननगर) व मुसदीक अहमद खुर्शीद अहमद उर्फ मुसा (रा. बजरंगवाडी) यांना दाेन वर्षासाठी हद्दपार करण्यात आले आहे. 

रवींद्र कुवर याचा प्रस्ताव कॅम्प विभागाचे उपअधिक्षक मंगेश चव्हाण यांनी तर उर्वरित तिघांचे प्रस्ताव तत्कालीन शहर उपअधिक्षक रत्नाकर नवले यांनी सादर केले होते. सदर प्रस्ताव 2019 मध्ये दाखल करण्यात आले होते. त्यावर कारवाई करत प्रांताधिकारी शर्मा यांनी चौघांना हद्दपार केले. हद्दपार आदेशाची अंमलबजावणी संबंधितांना तात्काळ करायची आहे. पोलिस व प्रशासनाने गुन्हेगारांविरुध्द हद्दपारीचा बडगा उगारल्यामुळे इतर गुन्हेगारांना वचक बसू शकेल. 

हेही वाचा > एकुलती एक चिमुरडी झाली पोरकी! बाप अपराधी तर आई देवाघरी; सातपूरमधील दुर्दैवी घटना

हेही वाचा > धक्कादायक! आजोबांचे हातपाय बांधून नातूने फेकले नाल्यात; अंगावर काटा आणणारी करतूत 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: malegaon four criminal exiled three districts nashik marathi news