esakal | धक्कादायक!...अन् 'त्या' पोलिस उपनिरीक्षकाने स्वत:वरच झाडली गोळी...
sakal

बोलून बातमी शोधा

उपनिरीक्षक अजहर शेख.jpg

शहर उपअधिक्षक रत्नाकर नवले यांचे वाचक उपनिरीक्षक अजहर शेख यांनी उपअधिक्षक कार्यालयानजीकच्या महिला समुपदेशन कार्यालयाजवळील झाडाखाली स्वत:च्या सर्व्हीस रिव्हॉलव्हरमधून डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली. शनिवारी (ता.११) दुपारी साडेचारच्या सुमारास नियंत्रण कक्ष आवारात जिल्हा पोलिस अधिक्षक आरती सिंह यांच्या उपस्थितीत वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक सुरु असतानाच नजीकच हा प्रकार घडल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. 

धक्कादायक!...अन् 'त्या' पोलिस उपनिरीक्षकाने स्वत:वरच झाडली गोळी...

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : (मालेगाव) येथील शहर उपअधिक्षक रत्नाकर नवले यांचे वाचक उपनिरीक्षक अजहर शेख यांनी उपअधिक्षक कार्यालयानजीकच्या महिला समुपदेशन कार्यालयाजवळील झाडाखाली स्वत:च्या सर्व्हीस रिव्हॉलव्हरमधून डोक्यात गोळी घालून आत्महत्या केली. शनिवारी (ता.११) दुपारी साडेचारच्या सुमारास नियंत्रण कक्ष आवारात जिल्हा पोलिस अधिक्षक आरती सिंह यांच्या उपस्थितीत वरीष्ठ पोलिस अधिकाऱ्यांची बैठक सुरु असतानाच नजीकच हा प्रकार घडल्याने पोलीस दलात खळबळ उडाली आहे. 

अशी आहे घटना

उपनिरीक्षक शेख शहर पोलिस ठाण्यात नेमणुकीस होते. कर्तव्यदक्ष, कामाची धडाडी व हसतमुख स्वभाव असल्याने त्यांची उपअधिक्षकांचे वाचक उपनिरीक्षक म्हणून नेमणूक झाली होती. शहरातील कोरोनाबाधित रुग्णांची वाढती संख्या, लॉकडाऊन, संचारबंदी, शब-ए-बारातचा बंदोबस्त या सर्व कामात गेली चार दिवस ते सतत कार्यमग्न होते. आज दुपारी श्रीमती सिंह येथे दाखल झाल्या. शहरातील परिस्थिती व संचारबंदी संदर्भात पोलिसांच्या उपाययोजना, रणनिती, बंदोबस्त या संदर्भात त्यांची अपर अधिक्षक संदीप घुगे, उपअधिक्षक रत्नाकर नवले, मंगेश चव्हाण व विविध पोलिस ठाण्यांच्या प्रमुखांबरोबर बैठक सुरु होती. त्यावेळी उपअधिक्षक कार्यालयात असलेले श्री. शेख नजीकच्या महिला समुपदेशन कार्यालयाजवळील झाडाखाली उभे होते. सर्व्हीस रिव्हॉलव्हरमधून त्यांनी डोक्यात गोळी झाडली. ते जागीच कोसळले. घटनास्थळी रक्ताचे थारोळे झाले होते. वाहतूक शाखेचे पोलिस निरीक्षक बशीर शेख यांना ही माहिती समजली. त्यांनी बैठक सोडून महिला समुपदेशन कार्यालयाकडे धाव घेतली. जिल्हा पोलिस प्रमुखही घटनास्थळी दाखल झाल्या. या घटनेने शहर पोलिस दल हादरले आहे. 

अपघाती मृत्यू म्हणून नोंद

श्री. शेख यांची आत्महत्या पोलिस अधिकारी, कर्मचाऱ्यांवरील ताणतणावातून की कौटुंबिक कलहातून याबाबत निश्‍चित माहिती समजू शकली नाही. सायंकाळी त्यांचा मृतदेह विच्छेदनासाठी सामान्य रुग्णालयात नेण्यात आला. शहर पोलिस ठाण्यात या घटनेची अपघाती मृत्यू म्हणून नोंद करण्यात आली आहे. जिल्हा पोलिस अधिक्षक आरती सिंह, अपर पोलिस अधिक्षक संदीप घुगे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिस निरीक्षक रविंद्र देशमुख, सहाय्यक निरीक्षक हेमंत कडुकार तपास करीत आहेत.

हेही वाचा > 'हॉस्पिटल नव्हे हे तर शोभेचे बाहुले!'...'इथं' औषधांअभावी होतेय रुग्णांची आबाळ

जळगाव येथील मुळ रहिवासी उपनिरीक्षक अजहर शेख मुळचे जळगाव येथील आहेत. मुंबई पोलीस दलात ते भरती झाले होते. यानंतर पोलिस विभागांतर्गत परीक्षा देऊन ते उपनिरीक्षक झाले. सॉफ्ट बॉल खेळात ते विशेष नैपुण्य मिळवून होते. खेळाडू असल्याचा लाभही त्यांना मिळाला होता. त्यांच्या पश्‍चात पत्नी, आई-वडील असा परिवार आहे. श्री.शेख यांचे पहिल्या पत्नीशी वाद होते. ते मिटल्यानंतर त्यांनी दुसरा विवाह केला होता.

हेही वाचा > ''कोरोनाला तोंड देण्यासाठी खासगी डॉक्‍टरांनी पुढे यावे''- राधाकृष्ण गमे

go to top