''मालेगावकरांनी नावलौकिक कायम ठेवावा'' - डॉ. प्रतापराव दिघावकर

प्रमोद सावंत
Saturday, 3 October 2020

त्याचवेळी मनपा प्रशासनाने देखील अतिक्रमण होतांनाच प्रतिबंधासाठी प्रयत्न करावेत. येथील शहर वाहतुक शाखेला मनुष्यबळ वाढवून दिले आहे. शहरातील सीसीटीव्हीसाठी पोलिस अधिक्षक व दोन अधिकारी अशी समिती गठीत झाली आहे. सीसीटीव्हीमुळे गुन्हे उघडकीस येण्यास मदत होईल.

नाशिक : (मालेगाव) संवेदनशील मालेगावची ओळख केव्हाच बदलली आहे. जग कोरोनाच्या संकटाने हवालदिल झाले असतांना लोकांची भिती दूर करण्यात शहरवासियांची भूमिका मोलाची आहे. येथील नागरिक खरे कोरोनायोध्दा आहेत. लॉकडाऊन काळातील सर्वधर्मीय सण शांततेत व शासन प्रतिबंधात्मक नियमात साजरे झाले. नवरात्रोत्सव व ईद-ए-मिलाद मध्ये हाच कित्ता गिरवून येथील नावलौकिक कायम ठेवावा असे नाशिक परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक डॉ. प्रतापराव दिघावकर यांनी शनिवारी (ता. 3) सांगितले.

शेतकरी फसवणुकीचे पाच जिल्ह्यात 96 गुन्हे दाखल

डॉ. दिघावकर म्हणाले, की शहराचा कोरोना पॅर्टन सगळीकडे चर्चेत आहे. कोविड काळात पोलिस दलाचे काम उल्लेखनीय होते. विभागातील गुन्हेगारीला काही प्रमाणात आळा बसलेला असला तरी नांदगाव येथील बहुचर्चित हत्याकांडासह खुनाचे पाच गुन्हे उघडकीस आले नाहीत. त्यांचा तपास लावण्यासाठी प्रयत्न करू. माध्यमांनी आमच्यातील उणिवाही दाखवाव्यात. शेतकरी, सुशिक्षित बेरोजगार फसवणुकीला आळा, गुटखा, मटका बंद याला आपले प्रथम प्राधान्य आहे. पंधरा दिवसात अठरा लाखाचा गुटखा जप्त केला. शेतकरी फसवणुकीचे पाच जिल्ह्यात 96 गुन्हे दाखल झाले. तब्बल दीड कोटी रुपये शेतकऱ्यांना परत मिळाले. 107 व्यापारींनी पैसे देण्याची लेखी हमी दिली आहे. लोकाभिमुख पोलिसींग करण्याचा आपला प्रयत्न आहे. मला भेटण्यासाठी कोणीही मध्यस्थ अथवा अपॉईंटमेंटची गरज नाही. शेतकरी चेक बाऊन्सच्या केस वकीलांनी मोफत चालवाव्यात अशी आपली अपेक्षा आहे. 

हेही वाचा >  लिफ्ट देणे आले अंगाशी; दहीपूल तरुण खून प्रकरणाचा झाला खुलासा

...तर गुन्हे उघडकीस येण्यास मदत होईल

शहरातील गुन्हे व अतिक्रमण दूर करण्यासाठी तसेच रहदारीची कोंडी सोडविण्यासाठी प्रयत्न करु असे त्यांनी या वेळी सांगितले. महापालिकेला रस्त्यावरील अतिक्रमण हटविण्यासाठी पोलीस बंदोबस्त उपलब्ध करुन देऊ. त्याचवेळी मनपा प्रशासनाने देखील अतिक्रमण होतांनाच प्रतिबंधासाठी प्रयत्न करावेत. येथील शहर वाहतुक शाखेला मनुष्यबळ वाढवून दिले आहे. शहरातील सीसीटीव्हीसाठी पोलिस अधिक्षक व दोन अधिकारी अशी समिती गठीत झाली आहे. सीसीटीव्हीमुळे गुन्हे उघडकीस येण्यास मदत होईल. नियंत्रण कक्ष आवारातील सुसंवाद हॉलमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते. जिल्हा पोलिस अधिक्षक सचिन पाटील, अपर पोलिस अधिक्षक संदीप घुगे, उपअधिक्षक रत्नाकर नवले, मंगेश चव्हाण आदी व्यासपीठावर होते.

हेही वाचा > तीन तास मातृत्व धोक्यात; देवदूतांच्या समयसूचकतेने वाचले प्राण!


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Malegaon residents should maintain their reputation - Prataprao Dighavkar nashik marathi news