esakal | Sakal - Read Latest Breaking Marathi News from Maharashtra India & Around the World
sakal

बोलून बातमी शोधा

पोलिस.jpg

कोरोना संक्रमित रूग्णांच्या संख्येपेक्षा पोलिसांकडून प्रसाद घेतलेल्यांची संख्या भारतात अधिक आहे. इथंपासून तर घराबाहेर निघू नका, पोलिस खरोखरचं पब्जी खेळताय. अशा विविध संदेशांचा सोशल मिडीयावर अक्षरश: पाऊस पडतो आहे. लॉक-डाऊनच्या काळात रस्त्यावर फिरणाऱ्या टवाळखोरांवरील पोलिसांच्या कारवाईचे या माध्यमातून एकाप्रकारे कौतुक केले जाते आहे.

#Lockdown : 'बाहेर निघू नका, पोलीस खेळताय खरोखरचा पब्जी!'...कामगिरीचं होतंय कौतुक

sakal_logo
By
सकाळवृत्तसेवा

नाशिक : कोरोना संक्रमित रूग्णांच्या संख्येपेक्षा पोलिसांकडून प्रसाद घेतलेल्यांची संख्या भारतात अधिक आहे. इथंपासून तर घराबाहेर निघू नका, पोलिस खरोखरचं पब्जी खेळताय. अशा विविध संदेशांचा सोशल मिडीयावर अक्षरश: पाऊस पडतो आहे. लॉक-डाऊनच्या काळात रस्त्यावर फिरणाऱ्या टवाळखोरांवरील पोलिसांच्या कारवाईचे या माध्यमातून एकाप्रकारे कौतुक केले जाते आहे. 

पोलिसांकडून पाहुणचार घेणाऱ्या युवकांचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल

दंड भरल्याच्या पावतीप्रमाणे चोप दिल्याचीही पावती पोलिसांनी द्यायला हवी, अन्यथा पुढील चौकात पुन्हा चोप मिळेल. अशा आशयाचे संदेश सध्या सोशल मिडीयावर फिरता आहेत. गेल्या दोन दिवसांमध्ये लॉक-डाऊनच्या काळात पोलिसांनी केलेल्या कारवाईशी निगडीत या संदेशाने घरी बसलेल्या नेटकऱ्यांचे चांगलेच मनोरंजन होत आहे. विशेष म्हणजे असे संदेश प्राप्त झाल्यानंतर इतरांना फॉरवर्ड करणाऱ्यांचे प्रमाणही लक्षणीय आहे. या संदेशांप्रमाणे पोलिसांकडून पाहुणचार घेणाऱ्या युवकांचे व्हिडीओ चांगलेच व्हायरल होता आहेत. विविध ठिकाणच्या या व्हिडीओतून काहीही काम नसतांनाही रस्त्यावर फिरणारे व पोलिसांच्या तावडीत सापडल्यानंतर त्यांच्या विषयी व्यक्‍त केलेला प्रेमभाव दाखविला जातो आहे. 

हेही वाचा > 'ग्राहकांनो, कांदा खरेदीकडील हात आखडता घ्यावा लागणार वाटतंय!'...कारण

उठबशा काढण्यापासून तर जोरबैठका काढण्यापर्यंत, पोलिसांच्या दांडूक्‍याच्या फटकेबाजी पासून तर दांडूका चुकविण्याचे थरारक क्षण या व्हिडीओद्वारे मनोरंजनाचे साधन बनले आहे. अशा संदेश, व्हिडीओसह छायाचित्रांच्या पोस्टला फेसबुक, व्हॉट्‌सऍप, इन्स्टाग्राम सारख्या सोशल मिडीयावर चांगलीच पसंती मिळते आहे. या पोस्ट भरपुर प्रमाणात लाईक्‍स, कमेंट व शेअर केल्या जात आहेत. 

हेही वाचा > COVID-19 : लॉक-डाऊनमुळे 'ई-कॉमर्स'तर्फे सेवा खंडित; केवळ जीवनावश्‍यक वस्तूंची उपलब्धता

go to top