मालेगाव सायजिंगप्रकरणी मंगळवारी होणार सोक्षमोक्ष...काय असणार निर्णय?

सकाळ वृत्तसेवा
शनिवार, 27 जून 2020

शहरातील अन्य 64 सायजिंगला नॉन कन्फर्मिंग विभागात असल्याचे कारण देत प्रदूषण मंडळाने सायजिंग बंद करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यावर हा महापालिकेचा विषय आहे. सायजिंगमालकांनी महापालिकेचे एनओसी दिले आहे, असे याचिकाकर्त्यांतर्फे ऍड. मनोज हरित यांनी सांगितले.

नाशिक : (मालेगाव) शहरातील सायजिंग सीलिंगप्रकरणी शुक्रवारी (ता. 26) मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. न्यायालयाने सायजिंगमालक व प्रदूषण महामंडळाच्या वकिलांचा युक्तिवाद ऐकून घेत, निकाल राखीव ठेवला आहे. सीलिंगप्रश्‍नी दाखल याचिकेवर न्यायालय मंगळवारी (ता. 30) निकाल देण्याची शक्‍यता असल्याचे ऍड. मनोज हरित यांनी सांगितले.

मंगळवारी निकाल शक्‍य
 
यापूर्वी झालेल्या सुनावणीत सायजिंग असोसिएशन व याचिकाकर्त्यांच्या वकिलांनी राज्य प्रदूषण महामंडळाने काही अटी-शर्तींवर सायजिंग सुरू करण्यास संमती दिल्याचा मुद्दा न्यायालयात मांडला. यासंदर्भात प्रदूषण महामंडळाचे मत जाणून घेण्यासाठी न्यायालयाने शुक्रवारी सुनावणी ठेवली होती. मात्र, मंडळाच्या वकिलांनी असा कुठला विचार नसल्याचे शुक्रवारी सुनावणीत सांगितले. येथील 28 सायजिंग सील केल्या आहेत. यातील 23 सायजिंगमालकांनी या कारवाईला उच्च न्यायालयात आव्हान दिले आहे. युक्तिवाद पूर्ण झाल्याने मंगळवारी निकाल शक्‍य आहे. 

हेही वाचा > डॉक्टरच निघाला विश्वासघातकी...उपचारासाठी आलेल्या महिलेसोबत केला 'असा' धक्कादायक प्रकार

महापालिकेला तीन आठवड्यांची मुदत
 
शहरातील अन्य 64 सायजिंगला नॉन कन्फर्मिंग विभागात असल्याचे कारण देत प्रदूषण मंडळाने सायजिंग बंद करण्याबाबत कारणे दाखवा नोटीस बजावली आहे. त्यावर हा महापालिकेचा विषय आहे. सायजिंगमालकांनी महापालिकेचे एनओसी दिले आहे, असे याचिकाकर्त्यांतर्फे ऍड. मनोज हरित यांनी सांगितले. महापालिकेचे वकील न्यायालयात प्रथमच हजर झाले. त्यामुळे महापालिकेला मत मांडण्यासाठी तीन आठवड्यांची मुदत देण्यात आली. तूर्त या सायजिंग सुरूच आहेत.  

INSIDE STORY : मास्टरमाइंड दाऊदच्या नादाला लागून मेमन कुटुंबीय कसे झाले उध्वस्त? जाणून घ्या देशद्रोही कुटुंबाविषयी..​


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Malegaon sizing case verdict on Tuesday? nashik marathi news