ओबीसी समाजाचा आवाज  दाबण्याचा प्रयत्न करू नका; समीर भुजबळ अटकेच्या निषेधार्थ माळी समाज आक्रमक 

दत्ता जाधव
Saturday, 5 December 2020

कोविड नियमांचे पालन करून शांततेच्या मार्गाने मोर्चा काढून ओबीसींच्या मागण्या शासनापर्यंत पोहचवण्याचे प्रयत्न करत असतांना पुणे येथे ओबीसी मोर्चाला परवानगी नाकारून ओबीसी नेते माजी खासदार समीर भुजबळ यांना अटक करणे करणे म्हणजे ओबीसींची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे कि काय असा प्रश्न आम्हांला पडला आहे. 

पंचवटी (नाशिक) : पुणे शहर पोलिसांनी ओबीसी मोर्चाला परवानगी नाकारत माजी खासदार समीर भुजबळ यांना अटक करणे दुर्दैवी असल्याचे मत व्यक्त करत माळी समाज सेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत यांनी टीकेची झोड उठवत प्रसिद्धी पत्रक काढून निषेध व्यक्त केला आहे. 

समीर भुजबळ अटकेच्या निषेधार्थ माळी समाज सेवा समिती आक्रमक 
महात्मा फुले समता परिषद व ओबीसी संघटनांच्या वतीने राज्यांतील प्रत्येक तालुक्यात ओबीसींच्या विविध मागण्यांसाठी तालुकास्तरावर कोविड नियमांचे पालन करून शांततेच्या मार्गाने मोर्चा काढून ओबीसींच्या मागण्या शासनापर्यंत पोहचवण्याचे प्रयत्न करत असतांना पुणे येथे ओबीसी मोर्चाला परवानगी नाकारून ओबीसी नेते माजी खासदार समीर भुजबळ यांना अटक करणे करणे म्हणजे ओबीसींची मुस्कटदाबी करण्याचा प्रयत्न सुरु केला आहे कि काय असा प्रश्न आम्हांला पडला आहे. 

हेही वाचा > क्रूर नियती! तो' एक सेल्फीचा मोह अनावर; अन् माऊली लेकरांपासून दुरावली कायमची

सरकारचा ओबीसी व मराठा समाजांत दरी निर्माण करण्याचा प्रयत्न
शासन ओबीसींचा आवाज दाबण्याचा प्रयत्न करत असल्याचा संशय निर्माण होत असून गृह विभागाचा आम्ही जाहीर निषेध करत आहोत.ओबीसी आंदोलकांवर कोणत्याही प्रकारचे गुन्हे दाखल करू नये अशी मागणी करत.आरक्षणाच्या संदर्भात राज्यांमध्ये सरकार ओबीसी व मराठा समाजांमध्ये दरी निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे असे चित्र निर्माण झाल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही राऊत यांनी दिला आहे. 

हेही वाचा > नियतीची खेळी! लेकाला जेवण घेऊन माऊली आली शेतात; आणि घरी घडले भलतेच

कार्यकर्त्यांना अटकाव करू नये
शासनाने या घटनेची गंभीर दखल घेऊन ओबीसी मोर्च्यांना राज्यांत परवानगी नाकारू नये शिवाय कार्यकर्त्यांना अटकाव करू नये. अशी भूमिका माळी समाज सेवा समितीचे अध्यक्ष विजय राऊत यांनी मांडली. त्यावेळी सल्लागार उत्तमराव तांबे, उपाध्यक्ष उत्तमराव बडदे, कार्याध्यक्ष प्रभाकर क्षिरसागर, सरचिटणीस हरिश्चंद्र विधाते, खजिनदार प्रवीण जेजुरकर, प्रणव शिंदे, महेश गायकवाड, सचिन दप्तरे, किशोर भास्कर, संजय पुंड, नंदकुमार येवलेकर, भास्कर जेजुरकर आदी उपस्थित होते.  


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Mali Committee aggressive in protesting against arrest of Sameer Bhujbal nashik marathi news