"मराठा समाजाचा ओबीसी संवर्गात समावेश करावा"; मराठा सेवा संघाची मागणी

संतोष विंचू
Monday, 5 October 2020

न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड राज्य मागासवर्ग आयोगाचा २०१८ चा अहवालाचा संदर्भ घेऊन मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा, अशी मागणी मराठा सेवा संघातर्फे करण्यात आली आहे.

येवला (जि.नाशिक) : मराठा समाजाचा सरसकट ओबीसी संवर्गात समावेश करावा, अशी मागणी तालुका मराठा सेवा संघातर्फे करण्यात आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, तसेच मराठा आरक्षण समन्वय समितीचे अध्यक्ष अशोक चव्हाण यांसह मागणीचे निवेदन प्रांताधिकारी सोपान कासार, तहसीलदार रोहिदास वारुळे यांना देण्यात आले. 

मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा
न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड राज्य मागासवर्ग आयोगाचा २०१८ चा अहवालाचा संदर्भ घेऊन मराठा समाजाचा ओबीसी प्रवर्गात समावेश करावा, अशी मागणी मराठा सेवा संघातर्फे करण्यात आली आहे. न्यायमूर्ती एम. जी. गायकवाड आयोगाने सर्व तपासणी करून आपला अहवाल शासनाला सादर केला असल्याने व त्या अहवालात मराठा समाज सामाजिक, शैक्षणिक व आर्थिक क्षेत्रांत मागासलेला असल्याचे सिद्ध झाले आहे. त्यामुळे मराठा समाज राज्यघटनेच्या कलम ३४० मधील आरक्षणास पात्र ठरला आहे. या पार्श्वभूमीवर न्यायमूर्ती गायकवाड अहवालातील शिफारशी मान्य करून मराठा समाजाचा सरसकट समावेश राज्यातील अस्तित्वात असलेल्या ओबीसी आरक्षण यादीत करण्याची मागणी निवेदनात करण्यात आली आहे. 

हेही वाचा > ब्रेकिंग : पाकिस्तानसाठी तोफखान्याची हेरगिरी करणारा नाशिकमधून ताब्यात; सीमेवर तणावपूर्ण वातावरण असताना प्रकरण उजेडात

मराठा सेवा संघाची मागणी, प्रांताधिकाऱ्यांना निवेदन 
निवेदनावर तालुका अध्यक्ष बाजीराव सोनवणे, बाळासाहेब सोमासे, आनंदा बर्शीले, प्रमोद देवडे, माधव इंगळे, शिवाजी साताळकर, किरण जाधव, जयराम नळे, दत्ता भोरकडे, संदीप गटकळ, शंकर लांडगे, शिवाजी सावंत, संजय हिरे, नितीन अहिरे, सुरेंद्र ढोकणे, विजय मुंगसे, कृष्णा गरुडे, विजय गायकवाड, दिनकर दाणे आदींच्या स्वाक्षरी आहेत. 

हेही वाचा > संतापजनक! सोळा वर्षाच्या युवतीसोबत चाळीस वर्षीय नवरदेवाचे लग्न; बालविवाह कायद्यातंर्गत गुन्हा दाखल

संपादन - ज्योती देवरे
 

 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Maratha community should be included in OBC category nashik marathi news