
विवाह झाल्यापासून आठ वर्षे पती, सासरे, सासू, नणंद किरकोळ कामावरून वाद घालून शिवीगाळ व मारहाण करीत. बुलेट घेण्यासाठी पैशांची मागणी केली.
मालेगाव (जि.नाशिक) : विवाह झाल्यापासून आठ वर्षे पती, सासरे, सासू, नणंद किरकोळ कामावरून वाद घालून शिवीगाळ व मारहाण करीत. बुलेट घेण्यासाठी पैशांची मागणी केली.
बुलेटसाठी विवाहितेचा केला छळ
टेहरे येथील माहेरवाशीण असलेल्या विवाहितेच्या पतीला बुलेट घेण्यासाठी माहेरून एक लाख रुपये आणले नाहीत म्हणून छळ करीत जिवंत जाळून टाकण्याचा दम देऊन घराबाहेर हाकलून देणाऱ्या नगर येथील पती किशोर भगणे याच्यासह सासरकडील पाच जणांविरुद्ध छावणी पोलिस ठाण्यात विवाहितेच्या छळाचा गुन्हा दाखल झाला.
हेही वाचा - शुभमंगल सावधान आणि 'त्यांच्या' पासूनही जरा सावधान! टार्गेट सप्तपदीचा मुहूर्त
पोलिस ठाण्यात विवाहितेच्या छळाचा गुन्हा दाखल
विवाह झाल्यापासून आठ वर्षे पती किशोर, सासरे विठ्ठल भगणे, सासू, नणंद किरकोळ कामावरून वाद घालून शिवीगाळ व मारहाण करीत. बुलेट घेण्यासाठी पैशांची मागणी केली. वडिलांनी लग्नास सोन्याचे दागिने घेण्यासाठी दिलेले दोन लाख रुपये परत न करता घराबाहेर हाकलून दिल्याची तक्रार सारिका किशोर भगणे (वय २९, रा. नगर, हल्ली रा. टेहरे) हिने दिली आहे. छावणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.
हेही वाचा - निनावी पत्रावरून पोलीसांनी लावला शोध, हाती लागली धक्कादायक माहिती