BREAKING : शहरातील बाजारपेठा पुढच्या रविवारपर्यंत बंद! स्थानिक व्यावसायिकांनी एकमताने घेतला निर्णय

 IMG-20200620-WA0031
IMG-20200620-WA0031
Updated on

नाशिक : शालिमार व सभोवतालच्या परीसरात कोरोनाबाधित रूग्णांची संख्या वाढत असतांना प्रमुख बाजारपेठ बंद ठेवण्याचा निर्णय स्थानिक व्यावसायिकांनी एकमताने घेतला आहे. शनिवारी (ता.20) सकाळी झालेल्या बैठकीत झालेल्या निर्णयानुसार या तारखेपर्यंत प्रमुख बाजारपेठेतील सर्व दुकाने बंद ठेवली जाणार आहेत.

खरेदीसाठी होणारी गर्दी चिंताजनक

शालिमार परीसराला लागून असलेले जुने नाशिक परीसरासह गंजमाळ व अन्य भागांमध्ये कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. राज्य शासनाच्या पुनश्‍च हरीहोम योजनेंतर्गत दैनंदिन व्यवहारांमध्ये शिथिलता आणल्यानंतर अवघ्या काही दिवसांपूर्वीच बाजारपेठा खुल्या झाल्या होत्या. पहिल्या काही दिवसांमध्येच झालेल्या तुफान गर्दीमुळे कोरोनाचा प्रादुर्भाव वाढण्याची भिती व्यक्‍त केली जात होती. या पार्श्‍वभुमीवर महापालिका प्रशासनातर्फे सम-विषम तत्त्वानुसार दुकाने खुली करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र तरीदेखील रस्त्यावरील हातगाड्यांवर खरेदीसाठी होणारी गर्दी चिंताजनक बाब असल्याचे व्यावसायिकांचे म्हणणे होते. दरम्यान परीस्थितीची माहिती देण्यासाठी व्यावसायिकांच्या शिष्टमंडळाने काल (ता.19) पालकमंत्री छगन भुजबळ यांची भेट घेतली होती. एकंदरीत परीस्थितीबाबत यावेळी चर्चा करण्यात आली होती.

कोरोनाचा फैलाव होण्यास अटकाव

यानंतर शनिवारी (ता.20) सकाळी अकराच्या सुमारास मेनरोड परीसरात व्यावसायिकांची बैठक झाली. यावेळी माजी महापौर विनायक पांडे, ऍड. यतीन वाघ, माजी नगरसेवक राजेंद्र बागूल यांच्यासह व्यावसायिकांनी बैठकीत सहभागी होत चर्चा केली. बाजारपेठा बंद ठेवल्याने गर्दी टळेल व कोरोनाचा फैलाव होण्यापासून अटकाव होईल, अशी भुमिका मांडण्यात आली. यानंतर एकमताने बाजारपेठा बंद ठेवण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला.

या ठिकाणची दुकाने राहतील बंद

बैठकीत झालेल्या निर्णयानुसार पुढील रविवार (ता.28) पर्यंत शहरातील प्रमुख बाजारपेठा बंद ठेवल्या जाणार आहेत. यात मेनरोड, शिवाजीरोडसह सीबीएस ते अशोकस्तंभ परीसर, अशोक स्तंभापासून रविवार कारंजा, सराफ बाजार परीसर, कानडे मारूती लेन, भद्रकाली, दुध बाजार, महात्मा गांधी मार्ग (एमजी रोड) या ठिकाणची दुकाने बंद राहाणार आहेत.

किराणा, मेडिकल राहाणार सुरू

या परीसरातील दुकाने बंद राहणार असले तरी जीवनावश्‍यक वस्तुंना यातून सवलत दिलेली आहे. त्यानुसार किराणा दुकान, मेडिकल, दुध व्यावसायिक यांसह अन्य वस्तू, सेवांचे दुकान सुरू राहतील. निर्णयाच्या अंमलबजावणीसाठी भद्रकाली पोलिसांची मदत घेतली जाणार आहे.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com