esakal | निर्दयीपणाचा कळस! तीन दिवसाचे बाळ टाकले शेतात...अन् मग..
sakal

बोलून बातमी शोधा

baby delivery.gif

पुण्यात चार महिन्यांचे बाळ झुडपात सापडले असल्याची घटना ताजी असतानाच म्हाळदे शिवारातील शेतात तीन दिवसांपूर्वी जन्मलेले स्त्रीजातीचे जिवंत मूल बेवारस स्थितीत आढळले. आणि सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. 

निर्दयीपणाचा कळस! तीन दिवसाचे बाळ टाकले शेतात...अन् मग..

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

नाशिक / मालेगाव : पुण्यात चार महिन्यांचे बाळ झुडपात सापडले असल्याची घटना ताजी असतानाच म्हाळदे शिवारातील शेतात तीन दिवसांपूर्वी जन्मलेले स्त्रीजातीचे जिवंत मूल बेवारस स्थितीत आढळले. आणि सर्वांच्याच काळजाचा ठोका चुकला. हा प्रकार पाहता एकप्रकारे निर्दयीपणाचा कळसच होता.

काय घडले नेमके?

म्हाळदे शिवारातील शेतात तीन दिवसांपूर्वी जन्मलेले स्त्रीजातीचे जिवंत मूल बेवारस स्थितीत आढळले. अनोळखी स्त्री किंवा पुरुषाने या मुलीला शेतात टाकून दिल्याचा संशय आहे. हे मूल अनैतिक संबंधातून जन्माला आले असावे अथवा सांभाळ करणे शक्‍य नसल्याने किंवा मुलगी जन्माला आल्याने तिला उघड्यावर टाकल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला. याबाबत इस्लामिया कॉलनी भागातील मोहंमद जिशांत रईस अहमद (वय 24) याने पवारवाडी पोलिसांना माहिती कळविली. जिशांतसह जमादार प्रकाश काळे, महिला पोलिस शिपाई ज्योती अहिरे यांनी तीनदिवसीय बालिकेला येथील सामान्य रुग्णालयात दाखल केले. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू असून, अहिरे व रुग्णालयातील कर्मचारी बालिकेची देखभाल करीत आहेत. मोहंमद जिशांतच्या तक्रारीवरून बालिकेला फेकणाऱ्या अनोळखीविरुद्ध पवारवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. 

हेही वाचा > "पत्नी माझी पळून गेली..जगात तोंड दाखवायला जागा नाही..म्हणून आत्महत्या करतोय" फेसबूकवरील 'त्याची' धक्कादायक पोस्ट 

पोलीस घेत आहेत शोध

बाळाच्या जन्मदात्यांचा शोध घेण्यासाठी आजूबाजूच्या परिसरातील सीसीटीव्ही फुटेज वा स्थानिक लोक, इतरांकडून काही माहिती मिळते का याचा पोलीस शोध घेत आहेत.

हेही वाचा > रात्रीचे अकरा वाजता... युवती मालेगाव स्टॅण्ड परिसरात संशयास्पदरित्या फिरताना दिसली.. विचारणा केली तर पोलीसही हैराण

go to top