केवळ वीस हजारांसाठी विवाहितेला काढले घराबाहेर; सासरच्यांचा क्रूर प्रकार

विनोद बेदरकर
Friday, 4 September 2020

केवळ २० हजारांसाठी विवाहितेला घराबाहेर काढून दिल्याचा प्रकार शहरातील मदनीनगर भागात घडला. या प्रकाराची सर्वत्र निंदा होतेय. नेमके काय घडले?

नाशिक / मालेगाव : केवळ २० हजारांसाठी विवाहितेला घराबाहेर काढून दिल्याचा प्रकार शहरातील मदनीनगर भागात घडला. या प्रकाराची सर्वत्र निंदा होतेय. नेमके काय घडले?

असा घडला प्रकार

शिरीनबानो खलील अहमद हिला पती शेख खलील अहमद याने नवीन व्यवसाय सुरू करण्यासाठी माहेरून २० हजार आणण्यास सांगितले. मात्र विवाहितेने पैसे न आणल्याने तिला सासरकडच्या मंडळींनी मारहाण करत अंगावरील दागिने काढत घराबाहेर काढले. या प्रकरणी पतीसह पाच जणांविरुद्ध आयेशानगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. 

हेही वाचा > "वर्दी अंगावरच ठेवली, ती डोक्यात जाऊ दिली नाही!; नाशिकमधील कामकाजाबाबत विश्वास नांगरेंनी सांगितला अनुभव

पीडितेच्या घरात घुसून अश्‍लील वर्तन
मालेगाव : तालुक्यातील करंजगव्हाण येथे ३२ वर्षीय विवाहितेचा घरात घुसून विनयभंग करण्यात आला. या प्रकरणी संशयित पंकज ऊर्फ सोन्या ह्याळीज (वय ३०, रा. करंजगव्हाण) या तरुणाविरुद्ध वडनेर-खाकुर्डी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला. सोन्याने पीडितेच्या घरात घुसून अश्‍लील वर्तन करत विनयभंग केला. 

हेही वाचा > किरकोळ वादाने घेतले भयानक वळण! पिता-पुत्राच्या खुनाने शहरात खळबळ


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Married woman domestic violence case malegaon nashik marathi news